नक्षलींमध्ये धुमश्चक्री!
By Admin | Updated: August 10, 2014 03:41 IST2014-08-10T03:41:52+5:302014-08-10T03:41:52+5:30
झारखंडमध्ये माओवाद्यांच्या दोन गटांत जोरदार धुमश्चक्री उडाली असून, यात 16 जणांचा खात्मा करण्यात आला.

नक्षलींमध्ये धुमश्चक्री!
>मेदिनीनगर (झारखंड) : झारखंडमध्ये माओवाद्यांच्या दोन गटांत जोरदार धुमश्चक्री उडाली असून, यात 16 जणांचा खात्मा करण्यात आला. पलामू जिल्ह्यात पांडू पोलीस स्टेशनअंतर्गत कौडिया गावात शनिवारी पहाटे 2 ते 3च्या दरम्यान ही चकमक झडली. भाकपा (माओवादी) गटाने तृतीय प्रस्तुती कमिटी (टीपीसी)च्या सदस्यांवर हल्ला केला व रक्तपात घडवून आणला.
झारखंडचे पोलीस महासंचालक राजीवकुमार यांनी सांगितले की, पोलिसांना घटनास्थळावरून 16 टीपीसी नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळालेले नाहीत. त्या गटाने आपल्या साथीदारांचे मृतदेह व शस्त्रस्त्रे उचलून नेली, असे गावक:यांनी
सांगितले. गावात मोठय़ा संख्येत टीपीसीचे सदस्य आणि त्यांचे म्होरके दबा धरून होते, अशी माहितीही गावक:यांनी पोलिसांना दिली आहे. या हल्ल्यात दुस:या गटाचे नक्षली ठार झाले किंवा नाही, याची माहिती मिळू शकली नाही. घटनेचे वृत्त कळताच वरिष्ठ पोलीस अधिका:यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.
माओवाद्यांनी सूड उगविण्यासाठी टीपीसीवर हल्ला केल्याचे सूत्रंनी सांगितले. जवळपास एक वर्षापूर्वी टीपीसी नक्षल्यांनी माओवाद्यांवर हल्ला करून त्यांच्या वरिष्ठ नेत्यांसह 11 जणांची हत्या केली होती. त्यात बिहार-झारखंड विशेष क्षेत्रीय कमिटीचा सदस्य लवलेश यादवचाही समावेश होता.
या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला असावा,
असा अंदाज आहे. शुक्रवारच्या
चकमकीत मोठय़ा प्रमाणात शस्त्रस्त्रे आणि दारूगोळा वापरण्यात आला असल्याची माहिती मिळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. चकमकीच्या वेळी पोलिसांनी चौकीतून पळ काढल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे.
झारखंडमधील 24पैकी 18 जिल्ह्यांत माओवाद्यांनी उच्छाद मांडला आहे. राज्यात माओवाद्यांचे 17 गट आहेत व टीपीसीची स्थापना 2क्क्4मध्ये करण्यात आलेली आहे. या दोन्ही गटांत आजवर अनेक चकमकी झडल्या आहेत व रक्तपात घडवून आणण्यात आला आहे. दोन्ही गट एकमेकांवर गद्दारीचा आरोप करतात. टीपीसी गट पोलिसांना मदत करीत असून प्रशासनाला खबरा पुरवीत असतो, असा आरोपही दुस:या गटाकडून केला जातो.
नक्षली हल्ल्यात जवान शहीद
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षली हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा
एक जवान शहीद झाला. सीआरपीएफच्या 168 बटालियनचा जिग्नेश पटेल हा जवान शहीद झाला. या हल्ल्याला जवानांनी चोख उत्तर दिले तेव्हा नक्षल्यांनी तेथून पळ काढला. या नक्षल्यांच्या शोधासाठी मोहीम राबविली जात आहे.