मोठी बातमी! कुख्यात 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; महाराष्ट्र-छत्तीसगड-मध्य प्रदेश नक्षलमुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 12:48 IST2025-12-08T12:47:37+5:302025-12-08T12:48:51+5:30
Naxalite Surrender: आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये नक्षल कमांडर रामधेर मज्जी याचाही समावेश.

मोठी बातमी! कुख्यात 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; महाराष्ट्र-छत्तीसगड-मध्य प्रदेश नक्षलमुक्त
Naxalite Surrender: सरकारच्या नक्षलविरोधी मोहिमेला आज मोठे यश मिळाले आहे. काल आणि आज, अशा दोन दिवसात छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील 22 कुख्यात नक्षलवाद्यांनी आत्मसर्पण केले आहे. यामध्ये नक्षल कमांडर आणि सेंट्रल कमिटी मेंबर (CCM) रामधेर मज्जी याचाही समावेश आहे. यासह महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड (MMC झोन) नक्षलमुक्त झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रामधेर मज्जी हा भीषण नक्षली नेता हिडमाचा समकक्ष मानला जात होता. सुरक्षा दलांनी त्याच्यावर 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. नक्षलविरोधी मोहिमेच्या दृष्टीने ही एक निर्णायक आणि ऐतिहासिक घडामोड मानली जात आहे. यासह MMC झोन जवळपास नक्षलमुक्त झाला आहे. छत्तीसगडच्या एक दोन जिल्ह्यात काही स्थानिक नक्षलवादी उरले आहेत, ते येत्या काही दिवसात सरेंडर करू शकतात.
छत्तीसगडमध्ये शरण आलेल्या नक्षलवाद्यांची यादी
आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये रामधेर मज्जी (CCM) सोबत तीन डिव्हिजनल वाईस कमांडर (DVCM), तसेच इतर महत्त्वाचे माओवादी सदस्य सामील आहेत. त्यांच्या ताब्यातून AK-47, 30 कार्बाइन, INSAS, .303 रायफल, SLR यांसारखे घातक शस्त्रसाठेही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले.
रामधर मज्जी - CCM
चंदू उसेंडी - DVCM
ललिता - DVCM
जानकी - DVCM
प्रेम - DVCM
रामसिंह दादा - ACM
सुकेश पोट्टम - ACM
लक्ष्मी - PM
शीला - PM
सागर - PM
कविता - PM
योगिता - PM
मध्य प्रदेशात 10 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
तिकडे, मध्य प्रदेशातही 10 कुख्यात नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले आहे. या सर्व नक्षलवाद्यांवर एकूण 2.36 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर होते. मुख्यमंत्री म्हणाले, आजचा दिवस बालाघाट पोलिस आणि सर्व सुरक्षा दलांसाठी आमच्या नक्षलविरोधी मोहिमेत महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचे मार्गदर्शनाबद्दल मी आभार मानतो. 2026 पर्यंत नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे किंवा त्यांना या प्रदेशातून काढून टाकावे या ध्येयाकडे आमचे पोलिस पूर्ण वचनबद्धतेने काम करत आहेत.
VIDEO | Balaghat: Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav says, “Today is an important day for the Balaghat police and all security forces in our anti-Naxal campaign. I thank Prime Minister Narendra Modi and the Union Home Minister for their guidance. Our police have been… pic.twitter.com/TDuaLdqGD1
— Press Trust of India (@PTI_News) December 7, 2025
हिडमाच्या मृत्यूनंतर मिळाले आणखी मोठे यश
काही दिवसांपूर्वीच सुरक्षा दलांनी कुख्यात नक्षली नेता माडवी हिडमाला ठार केले होते. हिडमा हा बस्तर विभागातील सर्वात धोकादायक नक्षली कमांडर आणि CPI (माओवादी) च्या सेंट्रल कमिटीचा सदस्य होता. तो PLGA बटालियन-1चा प्रमुख होता आणि ताडमेटला (2010), झीरम घाटी हल्ला (2013) यांसह 26 पेक्षा अधिक मोठ्या हल्ल्यांचा मास्टरमाइंड मानला जात होता. त्याच्यावरही ₹1 कोटीचे इनाम जाहीर होता. 18 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशातील अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यातील मारेदुमिल्ली जंगलामध्ये झालेल्या चकमकीत हिडमा ठार झाला. या चकमकीत त्याची पत्नी राजेसह एकूण सहा नक्षली मारले गेले.