शहरं
Join us  
Trending Stories
1
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
2
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
3
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
4
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
5
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
6
NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला
7
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
8
Video: सिंहीणीने सिंहाला मारली एक 'फाईट', पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर
9
तुमचा आधार पुन्हा एकदा बदलणार; आता ना नाव असेल ना पत्ता, फक्त फोटोसोबत असेल QR कोड
10
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; बांगलादेशाच्या तीन नौका जप्त, 79 जणांना अटक
11
काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक
12
VVPAT: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 'व्हीव्हीपॅट' वापरण्यास आयोगाचा नकार, कारणही सांगितलं!
13
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
14
संरक्षण, विमा आणि धातू क्षेत्रातील 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स येणार तेजीत! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
15
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
16
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
17
Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
18
आता काळ बदलतोय! घर सांभाळण्यासाठी कपलने ठेवला 'होम मॅनेजर'; महिन्याला १ लाख पगार
19
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
20
'इंग्लिश विंग्लिश'मधली छोटी मुलगी आता दिसते सुंदर; अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज ठरलं; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 11:53 IST

Naxalite Encounter: सुरक्षा दलांनी छत्तीसगडमधील कारवाई तीव्र केल्यामुळे अनेक नक्षलगट आंध्र प्रदेशात स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Naxalite Encounter: आंध्र प्रदेश-ओडिशा सीमेवर नक्षलवाद्यांच्या वाढत्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत मोठे यश मिळाले आहे. मारेडुमिल्ली आणि जीएम वालसा जंगल परिसरात बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (ADG) महेश चंद्र लड्डा यांनी ही माहिती दिली. 

टॉप IED एक्सपर्ट ‘टेक शंकर’ ठार

ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये प्रमुख नाव मेटुरू जोगाराव उर्फ टेक शंकर याचे आहे. हा आंध्र-ओडिशा बॉर्डर स्पेशल झोनल कमिटी (AOBSZC) च्या तांत्रिक शाखेचा प्रमुख होता. सुरक्षा यंत्रणांच्या मते, टेक शंकरनेच मागील काही वर्षांत छत्तीसगड व आंध्र-ओडिशा क्षेत्रात लँडमाइन व IED हल्ल्यांचे डिझाइन आणि अंमलबजावणी केली होती. शस्त्रनिर्मिती, संचार प्रणाली, स्फोटकांची रचना या बाबतीत त्याला विशेष कौशल्य असल्याने त्याला संघटनेचा “टेक्निकल प्रमुख” मानला जात असे.

सीमावर्थी भागात वाढता नक्षलवाद

गेल्या काही महिन्यांत आंध्र-ओडिशा सीमाभागात नक्षलवादी हालचाली वाढल्याचे इनपुट मिळत होते. नक्षल गटांनी जंगलात नवीन अड्डे उभारणे, जुन्या कॅडरला सक्रिय करणे आणि छत्तीसगडच्या दिशेने येणाऱ्या गटांना प्रवेश देण्याच्या हालचाल सुरू होती. या पार्श्वभूमीवर ग्रेहाउंड्स आणि इतर सुरक्षा पथकांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन सुरू केले. त्याच मोहिमेचा परिणाम म्हणून बुधवारी सकाळी तीव्र चकमक झाली.

ADG लड्डा यांनी सांगितले की, 17 नोव्हेंबरला मारेडुमिल्ली परिसरात झालेल्या मोठ्या कारवाईत कमांडर हिडमा याच्यासह सहा नक्षलवादी ठार झाले होते. त्या कारवाईत मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी सीमेवरील संपूर्ण नेटवर्कवर विशेष लक्ष केंद्रित केले आणि विविध जिल्ह्यांत सातत्याने ऑपरेशन्स राबवले. याच कारवाईदरम्यान, आज सात नक्षलवादी ठार झाले आहेत.

राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

गेल्या काही दिवसांत एनटीआर, कृष्णा, काकीनाडा, कोनसीमा आणि एलुरु जिल्ह्यांतून एकूण 50 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या अटकांमध्ये केंद्रीय समिती, राज्य समिती, एरिया कमिटी आणि प्लाटून स्तरावरील महत्त्वाच्या सदस्यांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोर कॅडर एकाचवेळी पकडले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी 45 रायफल/बंदुका, 272 जिवंत काडतुसे, 2 मॅगझीन, 750 ग्रॅम वायर (IED साठी वापरली जाणारी), तांत्रिक उपकरणे आणि स्फोटकांसंबंधित इतर दस्तऐवज जप्त केली आहेत.

सीमेवर हाय अलर्ट

सध्या छत्तीसगडमधील वाढत्या दबावामुळे काही नक्षल गट आंध्र प्रदेशात स्थलांतर करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळेच दलांनी संपूर्ण परिसरात सखोल सर्च ऑपरेशन्स चालू ठेवले आहेत. या कारवाईमुळे माओवादी संघटनेच्या तांत्रिक पायाभूत संरचनेला मोठा फटका बसल्याचे सुरक्षा यंत्रणा मानतात. तसेच, सीमेवर क्षेत्रातील वाढती नक्षलवादी हालचाल रोखण्यासाठी ही एक निर्णायक आणि धोरणात्मक यशस्वी कारवाई असल्याचे मानले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Andhra-Odisha Border: Key Naxalite 'Tech Shankar' Among Seven Killed in Encounter

Web Summary : Security forces killed seven Naxalites, including tech expert 'Tech Shankar,' in Andhra-Odisha border encounter. Operations targeted rising Naxal activity, resulting in significant arrests and seizure of weapons. This action disrupts Maoist technical infrastructure.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीAndhra Pradeshआंध्र प्रदेशOdishaओदिशाChhattisgarhछत्तीसगड