शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Naxalite Dinesh Gope: कुख्यात नक्षलवादी दिनेश गोप नेपाळमधून अटक; त्याच्यावर होता 30 लाखांचा इनाम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 14:43 IST

देशाबाहेर बसून भारतात नक्षलवादी कारवाया करायचा. त्याच्यावर 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

Naxalite Dinesh Gope:झारखंडमध्ये अनेक वर्षांपासून नक्षलवादी कारवाया करत असलेला कुख्यात नक्षलवादी नेता दिनेश गोपे याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एनआयएच्या सहकार्याने नेपाळमधून अटक केली आहे. दिनेश पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया (PLFI) चा प्रमुख आहे. झारखंडमध्ये त्याच्यावर 30 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. 

पोलीस आणि CRPF, दोघेही या नक्षलवादी नेत्याचा 15 वर्षांपासून शोध घेत होते. सध्या तो नेपाळमध्ये लपून बसला होता. दिनेश गोप झारखंडमध्ये अनेक वर्षांपासून नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. त्याच्यावर 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याचे अनेक साथीदार अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सध्या सुरू आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच पोलिसांना या नक्षलवाद्याबाबत माहिती मिळाली होती. यामध्ये दिनेश गोप हा वेश बदलून नेपाळमध्ये लपून बसल्याचे सांगण्यात आले. या इनपुटच्या आधारे, दिल्ली पोलिसांनी केंद्रीय एजन्सीसह संयुक्त कारवाई केली आणि रविवारी नेपाळमधील त्याच्या लपण्याच्या ठिकाणावरुन त्याला पकडले.

दिनेश गोपे झारखंडमध्ये सर्वाधिक सक्रिय आहे. हा नक्षलवादी नेपाळमध्ये बसून छत्तीसगड आणि झारखंडमध्ये नक्षलवादी कारवाया करत होता. त्यासाठी तो नेपाळमधून आवश्‍यकतेनुसार ये-जा करत असे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दिनेश गोप याने दाढी वाढवून शिखांप्रमाणे पगडी बांधायला सुरुवात केली होती. नेपाळमध्ये अटक झाली तेव्हाही त्याने पगडी घातली होती. या नक्षलवाद्यांचे नेटवर्क बेल्जियम आणि चीन, पाकिस्तान आणि स्कॉटलंड व्यतिरिक्त देशाबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंड