शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पुढच्या 3-4 वर्षांत नक्षलवाद्यांचा बीमोड करू - राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 10:40 AM

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुढच्या 3-4 वर्षांत देशातील नक्षलवाद्यांचा बीमोड करू असं म्हटलं आहे. झारखंडमधील चतरामध्ये मंगळवारी (23 एप्रिल) एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी नक्षलवादावर भाष्य केले आहे.

ठळक मुद्दे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुढच्या 3-4 वर्षांत देशातील नक्षलवाद्यांचा बीमोड करू असं म्हटलं आहे.झारखंडमधील चतरामध्ये मंगळवारी (23 एप्रिल) एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी नक्षलवादावर भाष्य केले आहे. 'देशाच्या 126 जिल्ह्यांमध्ये पसरलेला नक्षलवाद आता केवळ फक्त 7-8 जिल्ह्यांपर्यंतच मर्यादित राहीला आहे.'

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुढच्या 3-4 वर्षांत देशातील नक्षलवाद्यांचा बीमोड करू असं म्हटलं आहे. झारखंडमधील चतरामध्ये मंगळवारी (23 एप्रिल) एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी नक्षलवादावर भाष्य केले आहे. 

'देशाच्या 126 जिल्ह्यांमध्ये पसरलेला नक्षलवाद आता केवळ फक्त 7-8 जिल्ह्यांपर्यंतच मर्यादित राहीला आहे. पुढच्या 3-4 वर्षांत भारतातून नक्षलवाद्यांचा बीमोड करू असे आश्वासन मी तुम्हाला देतो' असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. तसेच सुरक्षा हा देशाच्या विकासामधील आवश्यक भाग आहे आणि त्याच्या मार्गात येणारे दहशतवादी यांना चिरडून टाकण्यात येईल, असं राजनाथ यांनी एका सभेत सांगितलं आहे.

झारखंडमधील नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यात आला आहे, राज्यात काही ठिकाणी असलेले त्यांचे अस्तित्व लवकरच संपुष्टात आणले जाईल. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसने सत्तेसाठी हातमिळवणी केली आहे, मात्र त्यांचे उद्दिष्ट सफल होणार नाही असेही गृहमंत्री म्हणाले आहेत. 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी 'मृतदेह मोजायचे काम गिधाडांचे असते शूरवीरांचे नाही' असे म्हटले होते. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची माहिती केंद्राने द्यावी अशी मागणी केली होती. तसेच यावरून राजकारण करू पाहणाऱ्यांना मृतदेह मोजायचे काम गिधाडांचे असते शूरवीरांचे नाही असा टोला राजनाथ सिंह यांनी लगावला होता. 

उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये सोमवारी (1 एप्रिल) एका प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राजनाथ सिंह या रॅलीमध्ये  सहभागी झाले असून यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 1971 ला स्व. इंदिरा गांधी यांचे सरकार असताना भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती, तेव्हा अटल बिहारी वायपेयी यांनी संसदेमध्ये उभे राहून त्यांची प्रशंसा केली होती. त्यावेळी पाकिस्तानला धूळ चारल्यामुळे इंदिरा गांधींचा जयजयकार होत असेल तर आता पाकिस्तानमध्ये घुसून धडा शिकवणाऱ्या पंतप्रधान मोदींची प्रशंसा का होत नाही? मोदींची प्रशंसा करण्याऐवजी काँग्रेसला एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी ठार झाले हे जाणून घेण्यात रस आहे. परंतु शूरवीर मृतदेह मोजत बसतात का? मृतदेह मोजण्याचे काम वीरांचे नाही तर गिधाडांचे असल्याचा टोला राजनाथ सिंह यांनी लगावला होता.

 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहnaxaliteनक्षलवादीIndiaभारत