मोदी-शाह-योगी यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी; नवाज शरीफ यांच्या अटकेसाठी पोलीस रवाना 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 04:14 PM2022-03-31T16:14:47+5:302022-03-31T16:16:43+5:30

Crime News : कव्वाली गायक नवाज शरीफ यांनी 28 मार्च रोजी मनगवां भागात उर्स दरम्यान आयोजित कार्यक्रमात ही टिप्पणी केली.

nawaz sharif gives anti india remark and controversial statement against modi shah yogi booked under ipc | मोदी-शाह-योगी यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी; नवाज शरीफ यांच्या अटकेसाठी पोलीस रवाना 

मोदी-शाह-योगी यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी; नवाज शरीफ यांच्या अटकेसाठी पोलीस रवाना 

Next

रीवा : मध्य प्रदेश (MP) पोलिसांनी उत्तर प्रदेश (UP)मधील एका कव्वाली गायकाविरुद्ध रीवा (Riwa) जिल्ह्यात एका संगीत कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. कव्वाली गायक नवाज शरीफ यांनी 28 मार्च रोजी मनगवां भागात उर्स दरम्यान आयोजित कार्यक्रमात ही टिप्पणी केली.

व्हिडिओ व्हायरल
कव्वाली गायक नवाझ शरीफ यांनी 28 मार्च रोजी रीवा जिल्ह्यातील मनगवां भागात उर्स दरम्यान आयोजित कार्यक्रमात ही टिप्पणी केली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये नवाज शरीफ कथितपणे असे म्हणताना ऐकण्यात येते की, "मोदी जी म्हणतात आम्ही आहोत, योगी जी (यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ) म्हणतात आम्ही आहोत, अमित शहा म्हणतात आम्ही आहोत, पण हे कोण आहेत? जर गरीब नवाज हवा असेल तर हिंदुस्थान कुठे स्थायिक झाला होता, कुठे आहे हे कळणार नाही."

अटकेसाठी पोलिसांची टीम रवाना
अतिरिक्त पोलिस अधीक्षक शिवकुमार वर्मा यांनी सांगितले की, नवाज शरीफ आणि कार्यक्रमाचे आयोजक उर्स इदगाह कमिटी मनगवां यांच्याविरुद्ध बुधवारी आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नवाज शरीफ यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशात पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अनेक सोशल मीडिया युजर्स आणि भाजप नेत्यांनी नवाज शरीफ यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

Web Title: nawaz sharif gives anti india remark and controversial statement against modi shah yogi booked under ipc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.