शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

नौदलात लवकरच ५६ युद्धनौका, पाणबुड्यांचा होणार समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 6:18 AM

नौदलाच्या ताफ्यामध्ये नव्या ५६ युद्धनौका व पाणबुड्या सामील करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.

नवी दिल्ली : नौदलाच्या ताफ्यामध्ये नव्या ५६ युद्धनौका व पाणबुड्या सामील करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेचाही समावेश करण्यात येईल, असे नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा यांनी सोमवारी सांगितले. नौदल दिनानिमित्ताने पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ३२ युद्धनौकांची बांधणी सुरू आहे. किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी २.५ लाख मच्छीमार बोटींवर आॅटोमेटेड आयडेंटिफिकेशन ट्रान्सपॉन्डर्स बसविण्यात येत आहेत.समुद्री गस्तीनौकांच्या बांधणीला विलंब झाल्याबद्दल रिलायन्स नेव्हल इंजिनीअरिंग लिमिटेडवर नौदलाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे, असे लांबा यांनी सांगितले. या प्रकल्पाला बँकेने दिलेल्या हमीची रक्कम नौदलाने स्वत:च्या ताब्यात घेतली आहे. या प्रकरणाची नौदलाकडून चौकशी सुरू आहे. मात्र हा व्यवहार अद्याप रद्द झालेला नाही, असेही ते म्हणाले. मालदीवमध्ये भारताला अनुकूल असलेले सरकार आले असून दोन्ही देशांतील सागरी सुरक्षाविषयक सहकार्य वाढावे याचे प्रयत्न आहेत.मुंबई हल्ल्याने आली जाग२००८ साली दहशतवाद्यांनी मुंबईत घुसखोरी करून भीषण हल्ला चढविला होता. त्यामुळे देशाच्या सागरी सुरक्षेतील अनेक दोष ठळकपणे समोर आले होते. या हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत लष्कर, नौदल, हवाई दलात नवी संरक्षणसामग्री समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेला वेग आला.

टॅग्स :indian navyभारतीय नौदल