शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नौदलाला मिळणार 111 हेलिकॉप्टर्सचे बळ, 21 हजार कोटींच्या करारास संरक्षण मंत्रालयाची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 20:29 IST

संरक्षण मंत्रालयाने लष्कर आणि नौदलाच्यासाठीच्या मोठ्या करारास परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली - संरक्षण मंत्रालयाने लष्कर आणि नौदलाच्यासाठीच्या मोठ्या करारास परवानगी दिली आहे.  या करारामधून नौदलासाठी 111 हेलिकॉप्टर्स आणि लष्करासाठी सुमारे 150 आर्टिलरी गन सिस्टिम खरेदी करण्यात येणार आहेत. यापैकी हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी सुमारे 21 हजार कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्रालयाकडूवन एकूण 46 हजार कोटींच्या खरेदी व्यवहारांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्येच या हेलिकॉप्टर डीलचा समावेश आहे.  सैन्यदलांसाठीच्या या साहित्याचा खरेदीचा निर्णय संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या (DAC) बैठकीत  घेण्यात आला. डीएससी ही सैन्यासंबंधी खरेदी विक्रीचा निर्णय घेणारी मोठी संस्था आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या काराराबाबत सांगितले की, डीएसीने एकूण 111 हेलिकॉप्टर्सच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. त्यासाठी 21 हजार कोटी रुपये खर्च होतील. संरक्षण क्षेत्रातील भागीदारीनुसार संरक्षण मंत्रालयाचा हा पहिला प्रोजेक्ट आहे. मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणे हा या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश  आहे. 

  डीएसीने अजून काही खरेदी व्यवहारांनाही मंजुरी दिली आहे. त्यावर सुमारे 24 हजार 879 कोटी रुपये खर्च होतील. या खरेदी व्यवहारामधून लष्करासाठी 155 एमएमटची 150 आर्टिलरी गन खरेदी करण्यात येतील. या गन भारतातच विकसित केल्या जातील. या गन डिफेन्स आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) कडून डिझाइन आणि विकसित करण्यात येतील. त्यासाठी सुमारे तीन हजार 364 कोटी रुपये खर्च होतील. तसेच 14 व्हर्टिकल लॉन्च होणारी शॉर्ट रेंज मिसाईल प्रणाली खरेदी करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रासाठीची ही महत्त्वपूर्ण खरेदी बऱ्याच काळापासून प्रलंबित होती.  

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागIndiaभारतindian navyभारतीय नौदलIndian Armyभारतीय जवान