शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
2
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
3
कपिल शर्माला टक्कर द्यायला येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
4
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
5
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
6
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
7
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
8
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
9
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
10
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
11
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
12
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
13
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
14
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
15
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
16
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
17
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
18
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
19
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
20
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद

मला हटवून नवज्योत सिंग सिद्धूंना पंजाबचा मुख्यमंत्री व्हायचंय, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 3:06 PM

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे.

चंदीगडः पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. अमरिंदर सिंग पत्रकारांना उद्देशून म्हणाले, सिद्धू माझ्या जागी मुख्यमंत्री बनू इच्छित आहे. सिद्धू हा काँग्रेसचं प्रतिमा मलिन करत आहे. पक्षानं त्यांच्याविरोधात कारवाई केली पाहिजे. कॅप्टन सिद्धूंना लक्ष्य करत म्हणाले, खरंच सिद्धूंनी काँग्रेस विचारधारा स्वीकारली असल्यास त्यांनी तक्रारीसाठी निवडणुकीचा काळ निवडला नसता. पतियाळात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जात असलेल्या कॅप्टन यांनी पत्रकारांशी बातचीत करताना हा हल्ला चढवला आहे.  सिद्धू विरोधात कारवाई करावी की नाही, हे पार्टीच्या हायकमांडनं ठरवावं. परंतु काँग्रेसनं शिस्त भंग केल्याचं सहन करू नये. माझी त्यांच्याविरोधात खासगी तक्रार नाही, मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. ते महत्त्वाकांक्षी आहेत आणि मुख्यमंत्री बनू इच्छितात. तर गेल्या काही दिवसांपूर्वी अमरिंदर सिंग यांनी म्हटलं होतं की, जर राज्यात काँग्रेस निवडणूक हारली तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन. इतकंच नव्हे, तर त्यांनी सर्वच आमदार आणि मंत्र्यांना काँग्रेसच्या कामगिरीची जबाबदारी सोपवल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.तत्पूर्वी 14 मे रोजी नवज्योत सिंह सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी आरोप केला होता की, अमरिंदर सिंग यांच्यामुळेच पंजाबच्या प्रभारी आशा कुमारी यांना अमृतसर मतदारसंघातून तिकीट मिळालं नाही. परंतु अमरिंदर सिंग यांनी त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावत याच्याशी माझा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.आम्ही अमृतसरमधल्या बठिंडा जागेवरून त्यांना तिकीट देत होतो. पण ती तिथून निवडणूक लढवण्यास नकार दिला. तिकीट वाटपाचं सर्वच काम दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांकडे होतं. त्याच माझी कोणतीही भूमिका नसल्याचंही अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९