नवज्योतसिंग सिद्धूंचा चरणजीत सिंग चन्नींवर हल्लाबोल, काँग्रेसच्या पराभवाचं कारणही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 11:00 AM2022-04-22T11:00:53+5:302022-04-22T11:02:54+5:30

Navjot Singh Sidhu : नवज्योतसिंग सिद्धू यांनी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाचे कारण सांगत, राज्यात पसरलेल्या माफिया राजासाठी चरणजित सिंग चन्नी यांना जबाबदार धरले.

navjot singh sidhu again hits at charanjit singh channi for the congress defeat in punjab polls | नवज्योतसिंग सिद्धूंचा चरणजीत सिंग चन्नींवर हल्लाबोल, काँग्रेसच्या पराभवाचं कारणही सांगितलं

नवज्योतसिंग सिद्धूंचा चरणजीत सिंग चन्नींवर हल्लाबोल, काँग्रेसच्या पराभवाचं कारणही सांगितलं

Next

पंजाबमधीलकाँग्रेस नेत्यांचा अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्यावर निशाणा साधला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाचे कारण सांगत, राज्यात पसरलेल्या माफिया राजासाठी चरणजित सिंग चन्नी यांना जबाबदार धरले.

नवज्योतसिंग सिद्धू यांनीही काँग्रेसच्या पुनरागमनाचा मार्ग सांगितला आहे. सिद्धू म्हणाले, "काँग्रेसला नूतनीकरण करावे लागेल. पाच वर्षांच्या माफिया राजामुळे काँग्रेसचा पराभव झाला. मी या माफिया राजविरुद्ध लढत राहिलो. हा लढा व्यवस्थेविरुद्ध होता. काही लोकांचा उद्योग होता, जो राज्याला दीमक सारखा खात होता. यामध्ये मुख्यमंत्र्यांचाही सहभाग होता."

नवज्योत सिंग सिद्धू यांनी चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. अवैध वाळू उत्खननाचे प्रकरण समोर आल्यापासून नवज्योत सिंग सिद्धू हे चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नवज्योत सिंग सिद्धू आणि चरणजीत सिंग चन्नी या दोघांनाही दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावरही हल्लाबोल
चरणजीत सिंग चन्नी व्यतिरिक्त नवज्योतसिंग सिद्धू यांनी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावरही माफिया राजला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांच्यामुळेच गेल्या वर्षी काँग्रेस हायकमांडने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवले आणि चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीदरम्यान नवज्योतसिंग सिद्धू हे देखील काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सहभागी झाले होते. पण काँग्रेस पक्षाने नवज्योतसिंग सिद्धू ऐवजी पक्षाचा दलित चेहरा चरणजीत सिंग चन्नी यांचे नाव पुढे केले होते.

Web Title: navjot singh sidhu again hits at charanjit singh channi for the congress defeat in punjab polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.