नवनीत प्रकाशनचे संचालक नवीन शहा यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 11:58 IST2017-07-28T11:22:38+5:302017-07-28T11:58:00+5:30
मागच्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले अहमदाबाद येथील विकासक आणि नवनीत प्रकाशनाचे संचालक नवीन शहा (59) यांचा मृत्यू झाला आहे.

नवनीत प्रकाशनचे संचालक नवीन शहा यांचा मृत्यू
सूरत, दि. 28 - मागच्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले अहमदाबाद येथील विकासक आणि नवनीत प्रकाशनाचे संचालक नवीन शहा (59) अखेर मृतावस्थेत सापडले आहेत. गुजरातच्या अरवली जिल्ह्यात त्यांचा मृतदेह सापडला. नवीन शहा यांची हत्या झाल्याचा दाट संशय आहे. मंगळवार दुपारपासून नवीन शहा बेपत्ता होते. कार्यालयात जाण्यासाठी नवीन शहा दुपारी बोपाल येथील घरातून बाहेर पडले. ते घरी परतलेच नाहीत.
अदालाज पोलीस स्थानकात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. बेपत्ता झाल्यापासून शहा यांचा मोबाईल फोन स्विच ऑफ होता अशी माहिती गांधीनगरचे एसपी विरेंद्र कुमार यादव यांनी दिली. शहा वैष्णवदेवी सर्कलजवळच्या गोरबंध हॉटलेजवळून बेपत्ता झाले होते. त्यांनी गाडीचा चालक प्रभात देसाईला हॉटेलजवळ थांबायला सांगितले पण ते परतलेच नाहीत अशी माहिती अदालाज पोलीस ठाण्याचे निरीक्षक के.के. पांडया यांनी दिली.
नवीन शहा हे नवनीत पब्लिकेशनचे मालक लालजीभाई शहा यांचे जावई होते. लालजीभाई यांची मुलगी कंचनबेनबरोबर त्यांचे लग्न झाले होते.