नवी मुंबई काँगे्रसचा स्वबळाचा निर्धार * अशोक चव्हाणांनी केली चर्चा * सर्व १११ जागा लढण्याचे दिले संकेत

By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:07+5:302015-04-04T01:55:07+5:30

नवी मुंबई : नवी मंुबई महापालिका निवडणुकीसाठी काँगे्रसच्या उमेदवारांची यादी आणि निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात शुक्रवारी प्रदेश काँगे्रसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदीर्घ चर्चा करून स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून रणनीतीबाबत चर्चा केली. यात महापालिकेच्या सर्व १११ जागा स्वबळावर लढण्याचा निर्धार आम्ही केला असल्याचे जिल्हा काँगे्रसचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी लोकमतला सांगितले. स्थानिक कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा असल्याने या बैठकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानुसार निवडणुकीत पक्षाची रणनीती काय राहील, पक्षाची बलस्थाने आणि कमकुवत दुवे, इच्छुक उमेदवार याबाबत माहिती घेऊन चव्हाण यांनी मार्गदर्शन केल्याचे ते म्हणाले. चर्चेची ही पहिली फेरी असून अंतिम फेरीत काँगे्रसच्या उमेदवारांची यादी निश्चित करून ती जाहीर

Navi Mumbai Congress's decision to be sworn in * Ashok Chavan discusses all the 111 seats to contest | नवी मुंबई काँगे्रसचा स्वबळाचा निर्धार * अशोक चव्हाणांनी केली चर्चा * सर्व १११ जागा लढण्याचे दिले संकेत

नवी मुंबई काँगे्रसचा स्वबळाचा निर्धार * अशोक चव्हाणांनी केली चर्चा * सर्व १११ जागा लढण्याचे दिले संकेत

ी मुंबई : नवी मंुबई महापालिका निवडणुकीसाठी काँगे्रसच्या उमेदवारांची यादी आणि निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात शुक्रवारी प्रदेश काँगे्रसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदीर्घ चर्चा करून स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून रणनीतीबाबत चर्चा केली. यात महापालिकेच्या सर्व १११ जागा स्वबळावर लढण्याचा निर्धार आम्ही केला असल्याचे जिल्हा काँगे्रसचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी लोकमतला सांगितले. स्थानिक कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा असल्याने या बैठकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानुसार निवडणुकीत पक्षाची रणनीती काय राहील, पक्षाची बलस्थाने आणि कमकुवत दुवे, इच्छुक उमेदवार याबाबत माहिती घेऊन चव्हाण यांनी मार्गदर्शन केल्याचे ते म्हणाले. चर्चेची ही पहिली फेरी असून अंतिम फेरीत काँगे्रसच्या उमेदवारांची यादी निश्चित करून ती जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पक्षाने नेमलेले निरीक्षक माजी मंत्री रमेश बागवे, युवक काँगे्रसचे अध्यक्ष विश्वजित कदम, महिला नेत्या छायाताई आजगांवकर, अल्पसंख्याक नेते मुश्ताक अंतुले, सेवा दलाचे चंद्रकांत दायमा आणि माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे या बैठकीस उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चव्हाण स्वत: महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार असून १८ एप्रिल रोजी त्यांची जाहीर सभा होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. याशिवाय काँगे्रस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार आणि माजी मंत्रीही प्रचारात उतरणार असल्याचे या बैठकीत ठरले आहे.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Navi Mumbai Congress's decision to be sworn in * Ashok Chavan discusses all the 111 seats to contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.