अध्यक्षपदी नवले
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:15+5:302015-02-14T23:52:15+5:30
अकोले : तालुक्याची प्रती पंढरी समजल्या जाणार्या इंदोरी येथील विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी भरत नवले, तर सचिवपदी हेमंत आवारी यांची अविरोध निवड करण्यात आली.

अध्यक्षपदी नवले
अ ोले : तालुक्याची प्रती पंढरी समजल्या जाणार्या इंदोरी येथील विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी भरत नवले, तर सचिवपदी हेमंत आवारी यांची अविरोध निवड करण्यात आली.नव्या १५ विश्वस्थांची पाच वर्षांसाठी ग्रामसभेतून निवड करण्यात आल्यानंतर शनिवारी मावळते अध्यक्ष आबाजी धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्ष भरत नवले, सचिव हेमंत आवारी, उपाध्यक्ष रामनाथ नवले, सहसचिव राजेंद्र नवले व खजिनदार सुभाष नवले. कार्यकारी मंडळाची सूचना माया नवले यांनी मांडली, त्यास कल्पना थोरात यांनी अनुमोदन दिले. देवस्थानला क वर्ग दर्जा असून २५ लाख रुपयांच्या भक्त निवासाचे काम प्रगतिपथावर आहे. लवकरच प्रवारा तिरावर साकारलेल्या पुंडलिक मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा घेणार असल्याचा मानस नुतन कार्यकारणीने जाहीर केला. यावेळी विश्वस्त मंडळातील दत्ताञय आग्रे, दगडू देशमुख,रामनाथ नवले, मंगेश नवले, अमोल वाकचौरे, अशोक कडलग, सोमनाथ नवले, भाऊसाहेब सुर्यवंशी, मंदाबाई ठोंबाडे आदि उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी) सोबत हेमंत आवारी व भरत नवले यांचा पीपी फोटो