राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा शोध मोहीम प्रारंभ होणार : राष्ट्रपती

By Admin | Updated: June 10, 2014 01:22 IST2014-06-10T01:22:22+5:302014-06-10T01:22:22+5:30

भारतात खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारतर्फे राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

National sports talent search campaign to start: President | राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा शोध मोहीम प्रारंभ होणार : राष्ट्रपती

राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा शोध मोहीम प्रारंभ होणार : राष्ट्रपती

>नदी दिल्ली : भारतात खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारतर्फे राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना ही घोषणा केली. सरकारतर्फे भारतीय खेळाच्या विकासासाठी योजना राबविण्यात येणार आहे. त्यात ग्रामिण खेळांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात येईल. क्रीडा हा शालेय अभ्यासक्रमाचा अविभाज्य घटक राहणार असून खेळाच्या लोकप्रियतेसाठी सरकारतर्फे आवश्यक पावले उचलण्यात येणार आहे. मनोरंजनासाठी रचनात्मक कार्यक्रम तयार करताना भारतातील बालक व युवा वर्गाच्या विकासावर व तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे, असेही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: National sports talent search campaign to start: President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.