शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय : महत्त्वाचे

By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST

राष्ट्रीय-महत्त्वाचे

राष्ट्रीय-महत्त्वाचे
भारत-म्यानमार सीमेवर बॉम्बस्फोट, एक ठार
इम्फाल : मणिपूरच्या उखरूल जिल्ह्यातील भारत-म्यानमार सीमेवर गुरुवारी सायंकाळी एका शक्तिशाली बॉम्बचा स्फोट होऊन त्यात एक जण ठार आणि दोघे गंभीर जखमी झाले. या भागात तैनात असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य बनवून हा बॉम्ब रस्त्याच्या कडेला पेरून ठेवण्यात आला होता, असे पोलिसांनी सांगितले. या स्फोटाचा आवाज काही कि.मी. पर्यंत ऐकण्यात आला.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोन तरुणांना अटक
प्रतापगड : उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातील कचवा बाजान गावात एका १२ वर्षांच्या मुलीवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले. हे तरुण मुलीच्याच गावातील आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. ही मुलगी सकाळी घराबाहेर गेली असताना तरुणांनी तिला चाकूचा धाक दाखवून निर्जन स्थळी नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला.
मुजफ्फरनगर दंगल : एसआयटीचा क्लोजर रिपोर्ट
मुजफ्फरनगर : मुजफ्फरनगर दंगलीचा तपास करीत असलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आरोपींची अद्याप ओळख पटलेली नाही, असे सांगत पत्रकार राजेश वर्मा हत्याप्रकरणी आपला क्लोजर रिपोर्ट गुरुवारी मुख्य न्याय दंडाधिकारी नरेंद्र कुमार यांच्या न्यायालयात सादर केला. या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप सादर करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
मालदा येथे बनावट नोटा जप्त, दोघांना अटक
मालदा : पश्चिम बंगालच्या मालदा रेल्वे स्थानकावर पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातील दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या दोघांना पाठलाग केला आणि ते रेल्वे स्थानकावर आल्यानंतर त्याची सूचना रेल्वे पोलीसांना दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी दोघांनाही अटक केली. हे दोघेही बिहारच्या कटिहारचे राहणारे आहेत.
अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
बेंगळुरू : बेंगळुरूच्या सीमेवर असलेल्या हॉस्कोट येथे शुक्रवारी सकाळी एका आठ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा मृतदेह निर्जन स्थळी आढळला. ही मुलगी घरी परत न आल्याने तिच्या पालकांनी सकाळी तिचा शोध घेतला. त्यावेळी तिचा मृतदेह आढळून आला. ही मुलगी आपल्या पालकांसोबत हुबळीहून कामाच्या शोधात आली होती.
डीएचएनच्या दोन बंडखोरांना अटक
हाफलाँग : आसामच्या दिमा हासाओ जिल्ह्यात लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने दिमा हासाओ नॅशनल आर्मीच्या दोन कुख्यात बंडखोरांना अटक केली. या बंडखोरांजवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. या भागात काही बंडखोर दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर व पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.