राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान
By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:22+5:302014-12-18T22:39:22+5:30
कूपवाडात दहशतवादी ठार

राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान
क पवाडात दहशतवादी ठारश्रीनगर- कूपवाडा जिल्ह्यात सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी गुरुवारी ठार झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी आल्याची सूचना मिळताच सुरक्षा जवानांनी शोध मोहीम सुरू केली. त्यात कूपवाडा जिल्ह्याच्या सालकोट भागात दहशतवादी व जवानांसोबत चकमक उडाली. यात एक दहशतवादी ठार झाला. पोलीस पुढील तपास करीत आहेत.------------------------------------------ दोन कोटींची सिगारेट लुटलीनवादा- बिहारच्या नवादा जिल्ह्यात असलेल्या अकबरपुरा येथे लुटारूंनी एका ट्रक चालकाला बंदी बनवून ट्रकमधील दोन कोटी रुपये किमंतीची सिगारेट लंपास केली. ट्रकमध्ये सिगारेटची खोकी घेऊन जात असलेल्या या ट्रकला फतेहपूरजवळ अडविण्यात आले होते. या ट्रक चालकाला मारहाण करून ट्रकसह सोडून देण्यात आले. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.------------------------------------------------धर्मांतर प्रकरणाच्या तपासाचे आदेशबहराईच- येथील जिल्हा प्रशासनाने धर्मांतराच्या कथित प्रकरणांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी सत्येंद्र सिंग यांनी ही प्रकरणे कमलापुरी गावातील असल्याचे सांगून कुणीतरी पोलिसांसोबत खोडसाळपणा केला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. येथील दलितबहुल भागात धर्मांतर केले गेल्याची चर्चा केली जात होती. ---------------------------------------------१२ हजाराहून अधिक न्यायालये संगणकीकृतनवी दिल्ली- नोव्हेंबर २०१४ पर्यंत देशातील १२,३२३ न्यायालये संगणकीकृत झाली असल्याची माहिती लोकसभेत देण्यात आली. विधी व न्याय मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी, प्रलंबित प्रकरणांचा निकाल लवकर लावण्यासाठी न्यायालयात संगणक प्रणाली लावण्यात आली असल्याचे सांगितले. ---------------------------------------पाच नक्षलवाद्यांचे समर्पणरायपूर-छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात पाच नक्षल्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर बक्षीस घोषित करण्यात आले होते. जिल्हा मुख्यालयात गुरुवारी राजाराम कश्यप, बरसा सुखराम, धनरीराम, लखू व रामूराम यांनी आत्मसमर्पण केले. नक्षल्यांच्या अन्यायाला कंटाळल्याने नक्षलवाद सोडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ------------------------------------------