भारतीयांना मिळणार राष्ट्रीय ओळखपत्र
By Admin | Updated: July 9, 2014 01:20 IST2014-07-09T01:20:46+5:302014-07-09T01:20:46+5:30
देशातील सर्व वैध भारतीय नागरिकांना राष्ट्रीय ओळखपत्र देण्याची तयारी केंद्र सरकारने चालवली आह़े

भारतीयांना मिळणार राष्ट्रीय ओळखपत्र
नवी दिल्ली : देशातील सर्व वैध भारतीय नागरिकांना राष्ट्रीय ओळखपत्र देण्याची तयारी केंद्र सरकारने चालवली आह़े सर्व वैध भारतीयांचा राष्ट्रीय डाटाबेस तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून याअंतर्गत कालबद्धरीत्या राष्ट्रीय ओळखपत्रे जारी केली जाणार आहेत़
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी लोकसभेत निशिकांत दुबे यांच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल ही माहिती दिली़ ते म्हणाले की, कोण भारताचा वैध नागरिक आहे आणि कोण बेकायदेशीर, हे आपल्याला ठरवावे लागेल़ वैध भारतीयांची संख्या कळावी, यासाठी सरकारने राष्ट्रीय ओळखपत्र जारी करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आह़े पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे यासंदर्भात विविध राजकीय पक्षांची बैठक बोलवली होती़ राष्ट्रीय जनगणना नोंदणी आणि युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या संयुक्त प्रयत्नांतून वैध नागरिकांचा डाटा बेस तयार करण्यावर यावेळी चर्चा झाली़ हा डाटाबेस कालबद्धरीतीने तयार केला जाईल़ कोण भारताचा खरा नागरिक आणि कोण बेकायदेशीर, हे यातून कळेल़
सीमेपलीकडून होणारी अवैध घुसखोरी रोखण्यासाठी सरकारने आंतरराष्ट्रीय सीमेवर कुंपण उभारण्यासारखी अनेक पावले उचलली़ भारत-बांगलादेश सीमा 4क्96 किमी लांब आह़े यावर 33क्क् किमी भागात कुंपण उभारण्याचे काम पूर्ण झाले आह़े उर्वरित 5क्क् किमीवर कुंपण उभारणो बाकी आहे, अशी माहितीही राजनाथसिंग यांनी दिली़ (लोकमत न्यूज नेटवर्क)