शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या ED चौकशीपूर्वी रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 12:55 IST

National Herald Case: प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ड वाड्रांनी आपल्या मेहूण्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहीत, सत्याचा विजय होणार, असे म्हटले आहे.

Money Laundering Case: नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची आज ईडीसमोर चौकशी होत आहे. याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली असून, ईडी कार्यलयाबाहेर हजारोच्या संख्येने कार्यकर्ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ जमा झाले आहेत. यादरम्यान, राहुल गांधी यांचे मेहुणे(प्रियंका गांधी यांचे पती) रॉबर्ड वाड्रा यांची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

रॉबर्ट वाड्रा यांची भावनिक पोस्टराहुल गांधी यांच्या ईडीसमोर हजर होण्यापूर्वी, रॉबर्ट वड्रा यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी राहुल गांधी सर्व निराधार आरोपातून मूक्त होतील, असे म्हटले आहे. यात वाड्रा यांनी त्यांच्यावरील खटल्यांचा हवाला देत म्हटले की, 'मला ईडीने 15 वेळेस समन्स बजावला आहे, प्रत्येकवेळी मी ईडीसमोर जाऊन त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. मी माझ्या पहिल्या कमाईपासून आतापर्यंत ईडीसमोर 23,000 पेक्षा जास्त कागदपत्रे सादर केली आहेत.'

'मला विश्वास आहे की, विजय सत्याचा होणार. सरकार दडपशाहीच्या पद्धतीने देशातील जनतेला दडपून टाकू शखत नाही. आपल्या सर्वांना मजबूत व्हावे लागेल. आम्ही इथेच आहोत, प्रत्येक दिवस सत्यासाठी लढायचे आहे. देशातील जनता आमच्या पाठीशी उभी आहे,' असे वाड्रा म्हणाले.

सोनिया गांधींनी वेळ मागितला'नॅशनल हेराल्ड'शी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावले आहे. तपास एजन्सीने यापूर्वी राहुल गांधींना 2 जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी देशाबाहेर असल्याचे सांगून हजर राहण्यासाठी आणखी दिवसांची मुदत मागितली. याच प्रकरणी तपास यंत्रणेने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 23 जून रोजी समन्स बजावले आहे. यापूर्वी त्यांना 8 जून रोजी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, काँग्रेस अध्यक्षांना कोरोनाची लागण झाल्याने वेळ मागितला आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीrobert vadraरॉबर्ट वाड्राSonia Gandhiसोनिया गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस