राहुल गांधींच्या ED चौकशीपूर्वी रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 12:54 PM2022-06-13T12:54:05+5:302022-06-13T12:55:05+5:30

National Herald Case: प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ड वाड्रांनी आपल्या मेहूण्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहीत, सत्याचा विजय होणार, असे म्हटले आहे.

National Herald Case: Robert Vadra's emotional post before Rahul Gandhi's ED interrogation | राहुल गांधींच्या ED चौकशीपूर्वी रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट; म्हणाले...

राहुल गांधींच्या ED चौकशीपूर्वी रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट; म्हणाले...

Next

Money Laundering Case: नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची आज ईडीसमोर चौकशी होत आहे. याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली असून, ईडी कार्यलयाबाहेर हजारोच्या संख्येने कार्यकर्ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ जमा झाले आहेत. यादरम्यान, राहुल गांधी यांचे मेहुणे(प्रियंका गांधी यांचे पती) रॉबर्ड वाड्रा यांची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

रॉबर्ट वाड्रा यांची भावनिक पोस्ट
राहुल गांधी यांच्या ईडीसमोर हजर होण्यापूर्वी, रॉबर्ट वड्रा यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी राहुल गांधी सर्व निराधार आरोपातून मूक्त होतील, असे म्हटले आहे. यात वाड्रा यांनी त्यांच्यावरील खटल्यांचा हवाला देत म्हटले की, 'मला ईडीने 15 वेळेस समन्स बजावला आहे, प्रत्येकवेळी मी ईडीसमोर जाऊन त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. मी माझ्या पहिल्या कमाईपासून आतापर्यंत ईडीसमोर 23,000 पेक्षा जास्त कागदपत्रे सादर केली आहेत.'

'मला विश्वास आहे की, विजय सत्याचा होणार. सरकार दडपशाहीच्या पद्धतीने देशातील जनतेला दडपून टाकू शखत नाही. आपल्या सर्वांना मजबूत व्हावे लागेल. आम्ही इथेच आहोत, प्रत्येक दिवस सत्यासाठी लढायचे आहे. देशातील जनता आमच्या पाठीशी उभी आहे,' असे वाड्रा म्हणाले.

सोनिया गांधींनी वेळ मागितला
'नॅशनल हेराल्ड'शी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावले आहे. तपास एजन्सीने यापूर्वी राहुल गांधींना 2 जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी देशाबाहेर असल्याचे सांगून हजर राहण्यासाठी आणखी दिवसांची मुदत मागितली. याच प्रकरणी तपास यंत्रणेने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 23 जून रोजी समन्स बजावले आहे. यापूर्वी त्यांना 8 जून रोजी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, काँग्रेस अध्यक्षांना कोरोनाची लागण झाल्याने वेळ मागितला आहे.

Web Title: National Herald Case: Robert Vadra's emotional post before Rahul Gandhi's ED interrogation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.