शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

National Herald Case: सोनिया गांधींची ईडी चौकशी; काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर, ठिकठिकाणी निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 13:37 IST

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कलम ५० अंतर्गत सोनिया गांधी यांचा जबाब नोंदवला जात आहे. सोनिया गांधी यांची ईडी अधिकारी चौकशी करत आहेत.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी चौकशीसाठी बोलावलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र या कारवाईचा निषेध करत काँग्रेसचे कार्यकर्ते देशभर रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले असून त्याचा फटका वाहतूकीला बसला आहे. दिल्लीत पोलिसांकडून सकाळी ९ वाजल्यापासून गोल मेथी जंक्शन, तुगलक रोड जंक्शन, सुनहरी मस्जिद जंक्शन, मान सिंह रोड जंक्शन याठिकाणी प्रचंड बंदोबस्त तैनात केला आहे. 

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कलम ५० अंतर्गत सोनिया गांधी यांचा जबाब नोंदवला जात आहे. सोनिया गांधी यांची ईडी अधिकारी चौकशी करत आहेत. यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडसोबत त्यांचे कनेक्शन काय याचा तपास होत आहे. या कंपनीत सोनिया गांधींनी ३८ टक्के शेअर्स खरेदी करण्याचा निर्णय का घेतला? यंग इंडियन या कंपनीचं काम काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे ईडी सोनिया गांधी यांच्याकडून घेऊ शकते. 

मात्र सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीला विरोध करत काँग्रेस नेते, कार्यकर्ते रस्त्यावर उतरून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर, मुख्यमंत्री अशोक गहलोत, सचिन पायलट यांच्यासह अनेक नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोनिया गांधी यांचे वय ७० हून अधिक आहे. ईडी अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन चौकशी करायला हवी होती. मात्र सध्या सत्तेत केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत आहे असा आरोप गहलोत यांनी केला. 

मुंबईतही काँग्रेसचं आंदोलन महाराष्ट्रासह विविध भागात सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, सोलापूरात प्रणिती शिंदे, साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण, अमरावतीत यशोमती ठाकूर यांनी आपापल्या भागात आंदोलन केले. नागपूर, ठाणे, भिवंडीतही मोदी सरकारविरोधात आक्रोश व्यक्त करण्यात आला. मोदी सरकार दडपशाही करत असून काँग्रेस रस्त्यावरची लढाई सुरूच ठेवणार असं काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय