शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"धमकावण्याचा प्रयत्न...!"; सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध ED ने आरोपपत्र दाखल केल्यावरून काँग्रेस भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 22:15 IST

महत्वाचे म्हणजे, नॅशनल हेराल्ड प्रकरणात ६६१ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. दिल्ली, मुंबई आणि लखनौ येथील या मालमत्तांचा ताबा घेण्यासाठी संबंधित निबंधकांना (रजिस्टार्स) नोटीसही बजावण्यात आली आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याविरुद्ध ईडीने आरोपपत्र दाखल केल्याने काँग्रेस भडकली आहे. यासंदर्भात काँग्रेस पक्षाने मंगळवारी आरोप केला की, केंद्रीय एजन्सीकडून त्यांच्या वरिष्ठ नेत्यांवर केली जात असलेली कारवाई, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुडाचे राजकारण आणि धमकावण्या प्रयत्न आहे. 

यासंदर्भात, काँग्रेसचे सरचिटणीस आणि ज्येष्ठ नेते जयराम रमेश सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हणाले, "नॅशनल हेराल्डच्या मालमत्तेची जप्ती हा कायद्याच्या नावाखाली राज्याने केलेला गुन्हा आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्यांचे नेतृत्व, या प्रकरणात गप्प राहणार नाही. सत्यमेव जयते!"

तत्पूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणातील विशेष न्यायाधीशांनी ९ एप्रिल रोजी आरोपपत्रातील महत्त्वाचे मुद्दे तपासल्यानंतर पुढील सुनावणीसाठी २५ एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे.

न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, या प्रकरणाचा विचार करून पुढील सुनावणी २५ एप्रिल २०२५ रोजी होईल. त्या दिवशी, अंमलबजावणी संचालनालयाचे विशेष वकील आणि तपास अधिकारी यांनाही केस डायरी न्यायालयात सादर करावी लागेल, जेणेकरून ती न्यायालयालाही बघता येईल.

महत्वाचे म्हणजे, नॅशनल हेराल्ड प्रकरणात ६६१ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. दिल्ली, मुंबई आणि लखनौ येथील या मालमत्तांचा ताबा घेण्यासाठी संबंधित निबंधकांना (रजिस्टार्स) नोटीसही बजावण्यात आली आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी