राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी चाचणी परीक्षा

By Admin | Updated: April 15, 2015 00:03 IST2015-04-15T00:03:31+5:302015-04-15T00:03:31+5:30

लोणी कंद : कुस्ती क्षेत्रामध्ये उज्ज्वल भवितव्य आहे. त्यामुळे खेळाडूंनी परिश्रम घेऊन काम करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी केले.

National Examination for National Wrestling Competition | राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी चाचणी परीक्षा

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी चाचणी परीक्षा

णी कंद : कुस्ती क्षेत्रामध्ये उज्ज्वल भवितव्य आहे. त्यामुळे खेळाडूंनी परिश्रम घेऊन काम करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी केले.
रांची (छत्तीसगड) येथे होत असलेल्या कुमार युवा व महिला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुस्ती संघाची निवड चाचणी स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व जाणता राजा कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या वतीने लोणी कंद (ता. हवेली) येथे घेण्यात आली. त्याच्या शुभारंभप्रसंगी लांडगे बोलत होते.
राज्य कुस्ती परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, मारुती आडकर, नागनाथ देशमुख, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीपअप्पा भोंडवे, दिलीप बारणे, सचिन पलांडे आदींसह कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीपअप्पा भोंडवे म्हणाले, की राज्य संघाची निवड चाचणी स्पर्धा होत आहेत. जाणता राजा कुस्ती केंद्राच्या वतीने ग्रामीण भागात अशा स्पर्धा प्रथमच होत आहेत. राज्यातून सुमारे २५० मल्ल (पैलवान) दाखल झाले आहेत. सचिन पलांडे यांनी नियोजन व आभार मानले.
फोटोओळ : लोणी कंद (ता. हवेली) येथे जाणता राजा कुस्ती केंद्रामध्ये राज्य निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते झाला.
२) कुस्ती करताना खेळाडू.

Web Title: National Examination for National Wrestling Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.