(नाशिक महत्वाचे)कंटेनरखाली सापडून आई-मुलाचा मृत्यू
By Admin | Updated: August 2, 2015 23:31 IST2015-08-02T23:31:44+5:302015-08-02T23:31:44+5:30
पिंपरी : भोसरीवरून चिंचवडकडे जात असताना इंद्रायणीनगर कॉर्नर या ठिकाणी कंटेनरच्या जोरदार धडकेने दुचाकीस्वार आई व मुलाचा मृत्यू झाला. संगीता शिवाजी घोडके (४३) व श्रेयस (१२) अशी मृतांची नावे आहेत.

(नाशिक महत्वाचे)कंटेनरखाली सापडून आई-मुलाचा मृत्यू
प ंपरी : भोसरीवरून चिंचवडकडे जात असताना इंद्रायणीनगर कॉर्नर या ठिकाणी कंटेनरच्या जोरदार धडकेने दुचाकीस्वार आई व मुलाचा मृत्यू झाला. संगीता शिवाजी घोडके (४३) व श्रेयस (१२) अशी मृतांची नावे आहेत.संगीता या मूळच्या नाशिकच्या असून, त्या सध्या वाघोली या ठिकाणी राहत होत्या. त्यांचे पती व्यवसायानिमित्त चंडीगढमध्ये असतात. रविवारी सुटी असल्यामुळे त्या मुलासोबत नातेवाइकांकडे शाहूनगर, चिंचवड या ठिकाणी चालल्या होत्या. त्या दुचाकी चालवीत होत्या. पाठीमागून कंटेनरने जोरदार धडक दिल्याने दोघेही जागीच मृत्युमुखी पडले. कंटेनरचालक रमेशचंद्र याला पोलिसांनी अटक केली आहे. -----