नाशिकचे भाजपा आमदार राज ठाकरेंवर बरसले !
By Admin | Updated: April 4, 2015 01:54 IST2015-04-04T01:54:59+5:302015-04-04T01:54:59+5:30

नाशिकचे भाजपा आमदार राज ठाकरेंवर बरसले !
>- सिंहस्थ कामांकडे पाहा : केवळ हवापालटासाठी येऊ नका नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा ही काही महापालिकेची जबाबदारी नाही. केंद्र व राज्य सरकारने अद्याप निधीच वितरित केला नसल्याचे धक्कादायक विधान नाशिक दौर्यात करणार्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शहरातील तीनही भाजपा आमदार बरसले आहे. सिंहस्थ कामांची जबाबदारी झटकणार्या ठाकरे यांनी केवळ हवापालटासाठी नाशकात येऊन गोदापार्कवर फेरफटका मारण्यापेक्षा कुंभमेळ्याच्या कामांवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.भाजपा आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी राज ठाकरे यांच्या विधानाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी सिंहस्थ निधीबाबत महापालिकेचा आर्थिक भार कमी करत ७५ टक्के हिश्शाची जबाबदारी कोणतेही आढेवेढे न घेता घेतली. महापालिकेत सत्ता कोणाची आहे, याचा विचार केला नाही. मात्र राज ठाकरे यांनी सिंहस्थाबाबत विशेष बैठक घेतल्याचे स्मरत नाही, , असे त्या म्हणाल्या.आमदार बाळासाहेब सानप म्हणाले, मागील कुंभमेळ्याला अवघे १०० कोटी रुपये आले होते. यंदा भाजपा सरकारने अर्थसंकल्पात सिंहस्थासाठी २,४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. माहिती न घेता विधाने करण्यापेक्षा ठाकरे यांनी कामे कशी लवकरात लवकर मार्गी लागतील, यावर भर द्यावा. आ. सीमा हिरे म्हणाल्या, राज ठाकरे यांचे विधान चुकीचे व बेजबाबदारपणाचे आहे. मनसेने गेल्या तीन वर्षांत महापालिकेत जबाबदारी झटकण्याचेच काम केले आहे. नाशिकला येऊन केवळ गोदापार्कला फेरफटका मारला म्हणजे नाशिकचा विकास त्यात सामावला, असे नाही. (प्रतिनिधी)