नरसीत शोरुम फोडून दोन दूचाकी पळविल्या पोलिसांची निष्क्रियता: चोर्यांचे सत्र सुरुच
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:15+5:302015-03-20T22:40:15+5:30
नरसी फाटा/शंकरनगर: नरसीत चोर्यांचे सत्र सुरुच असून गुरुवारी रात्री चोरट्यांनी हिरो कंपनीचे शोरुम फोडून दोन दूचाकीसह रोख दोन लाख रुपये चोरुन नेले़ पोलिसाचेच घर फोडून चोरट्यांनी पोलिस यंत्रणेसमोर आव्हान उभे केले आहे़

नरसीत शोरुम फोडून दोन दूचाकी पळविल्या पोलिसांची निष्क्रियता: चोर्यांचे सत्र सुरुच
न सी फाटा/शंकरनगर: नरसीत चोर्यांचे सत्र सुरुच असून गुरुवारी रात्री चोरट्यांनी हिरो कंपनीचे शोरुम फोडून दोन दूचाकीसह रोख दोन लाख रुपये चोरुन नेले़ पोलिसाचेच घर फोडून चोरट्यांनी पोलिस यंत्रणेसमोर आव्हान उभे केले आहे़ देगलूर मार्गावर मुख्य रस्त्यालगत गोविंदराज मोटर्स हिरो कंपनीचे शोरुम आहे़ शोरुमच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला़ गल्यात ठेवलेले रोख दोन लाख रुपये व दोन दूचाकी चोरुन नेल्या़ २० रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली़ दरम्यान, दोन दिवसापूर्वीच नरसीत एका शिक्षकाचे घर फोडून रोख रक्कमेसह घरातील साहित्य चोरुन नेले होते़ पोलिस यंत्रणा कुचकामी ठरल्याचे लक्षात येताचा चोरट्यांनी मनसुबे आणखी पक्के करत दस्तूरखुद्द एका पोलिसाच्या घरावरही डल्ला मारला़ राज्य महामार्ग असल्याने नरसी चौकात दिवस-रात्र वाहनांची मोठी वर्दळ असते़ चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी रात्रीच्यावेळी गस्त घालण्यात येते़ मात्र ही गस्त कागदोपत्रीच सुरु असल्याने चोरट्यांना रान मोकळे झाले आहे़ गस्तीपथकातील कर्मचारी गस्त घालण्याऐवजी रात्री जाणारी वाहने अडवून एंन्ट्री वसूल करण्यात मग्न असल्याची वस्तूस्थिती समोर आली आहे़ रामतीर्थ ठाण्यात अधिकारी, कर्मचार्यांतील बेबनाव नवीन नाही़ मात्र याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे़ दोन दिवसापूर्वी झालेल्या चोरीचा सुगावा पोलिसांना अद्याप लागला नाही़ चोरीच्या घटना वाढल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे़ दरम्यान, चोरी झालेल्या दूचाकी शोरुमला उपविभागीय पोलिस अधिकारी अमोघ गावकर यांनी शुक्रवारी सकाळी भेट दिली़ चोरीचे वाढते प्रकार लक्षात घेता त्यांनी गस्तीवरील अधिकारी, कर्मचार्यांची झाडाझडती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली़ शोरुम फोडल्याप्रकरणी प्रशांत चिंतावार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामतीर्थ ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़