शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदेच्या पाण्याचे रंगले राजकारण, PM मोदींच्या गुजरातचं इलेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 05:45 IST

जिनिंग आणि मिठासाठी प्रसिद्ध असलेल्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत.

रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवर्कसुरेंद्रनगर : नर्मदेच्या पाण्याचा सर्वाधिक लाभ सुरेंद्रनगर जिल्ह्याला झाल्याचा दावा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असला, तरी जिल्ह्यातील अनेक भाग आजही दुष्काळाचे चटके सोसत असल्याने त्या गावांमध्ये ‘विकास नही पाणी जोईए’ असाच नारा घुमताना दिसत आहे. 

जिनिंग आणि मिठासाठी प्रसिद्ध असलेल्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१७च्या निवडणुकीत येथे पाचपैकी चार ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र, त्यापैकी दोघांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला व पोटनिवडणुकीत त्यांना पुन्हा विजयी करून येथे भाजपने आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिल्ह्यात दोन सभा झाल्या आहेत. त्यांनी सरदार सरोवर प्रकल्पाद्वारे नर्मदेचे पाणी आणले असून, त्याचा सर्वाधिक लाभ सुरेंद्रनगर जिल्ह्यालाच झाल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टीचे प्रमुख केजरीवाल यांनी पाण्याचा दावा खोटा असल्याचा आरोप केला आहे. तर पाणीवाटपात राजकारण केले जात असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. 

पाण्याच्या मुद्द्यावर जनताही आक्रमकजिल्ह्यातील काही गावांमध्येदेखील पाण्याच्या मुद्द्यावर जनता आक्रमक होताना दिसत आहे. ‘आमने विकास नथी पाणी जोईए...’ अशा प्रतिक्रिया खोडू (ता. वढवान) या गावात ऐकायला मिळाल्या. हे गाव पूर्वी पाण्यासाठी समृद्ध मानले जात होते. १९८६-८७मध्ये जिल्ह्यात सर्वात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी जिल्ह्यातील सुरेंद्रनगर शहरासह ५० गावांना या गावाने पिण्याचे पाणी दिले. मात्र, आज या परिसरातील जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेल्याने येथील शेती कोरडवाहू झाली आहे. या निवडणुकीत त्यासाठी ३१ गावांचे सरपंच एकत्र आले असून, त्यांनी पाण्यासाठी सरकारविरोधातच आंदोलन सुरू केले आहे. 

प्रचारात ‘पाणी’लीमडी तालुक्यातील सायला गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून तेथे आठ दिवसांनी पिण्याचे पाणी मिळते, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे तर चोटीला मतदार संघातील आनंदपूर व परिसरातील गावांना पाण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागते. हाच प्रश्न काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या प्रचाराचा मुद्दा बनला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022riverनदी