शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रयतेचा राजा, जाणता राजा... नरेंद्र मोदींचा शिवरायांना मानाचा मुजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 11:24 IST

स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते.

नवी दिल्ली- स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटवरून छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यासंदर्भात मोदींनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात मोदींनी शिवाजी महाराजांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व बहुआयामी होतं. त्यांनी सुशासन आणि प्रशासन एकसंध करून हिंदुस्तानाच्या इतिहासाचा नवा अध्याय लिहिला. आणि स्वतःची योग्यता आणि क्षमतेच्या आधारावर त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. संघर्षमय जीवन असतानाही त्यांनी असाध्य असं कार्य साध्य करून दाखवलं. त्याचं व्यक्तित्व अद्वितीय आहे. शिवाजी महाराज हे नेहमी सत्य आणि न्यायासाठी लढत राहिले. देशभक्ती त्यांच्यात भिनलेली होती. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना ते आपले राजे वाटत, असंही मोदींनी लिहिलं आहे. मोदींनी प्रभू रामचंद्रांच्या हवाला देत शिवाजी महाराजांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. ‘प्रभू रामांनी लहानसहान लोकांना, वानरांना एकत्रित करून सेना बनवली आणि युद्धात विजय मिळवला, तशाच प्रकारे शिवाजी महाराजांची संघटन कौशल्याच्या जोरावर शेतकरी आणि मावळ्यांना एकत्र करून युद्धासाठी सज्ज केले.छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही सर्वांच्या मनात ताजी आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. शिवाजी महाराज एक फार हुशार सैन्य रणनीतिकार होते. ते पहिले भारतीय शासकांमध्ये पहिले असे शासक होते, ज्यांना नौसेनेचं महत्त्व चांगलंच कळालं होतं. त्यासाठीच त्यांनी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या किल्ल्यांमध्ये नौसेना स्थापन केली होती. रत्नागिरीमध्ये त्यांनी जहाजांची डागडुजी करण्यासाठी किल्ल्याची निर्मिती केली होती. तसेच त्यांनी सैन्याचं महत्व ओळखून सैन्य 2 हजारांहून वाढवून 10 हजार केलं होतं. शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा होय. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा. गडाच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव ‘प्रचंडगड’ असे ठेवले. वयाच्या16व्या वर्षी तोरणा सर करून ज्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज