शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या जागा घटणार, पण केंद्रात मोदी सरकार कायम राहणार - सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 21:52 IST

देशपातळीवर होत असलेली विरोधकांची एकजूट, महागाई, बेरोजगारीवरून मतदारांमध्ये असलेली नाराजी यांचा फटका  नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला बसण्याची चिन्हे आहेत.

नवी दिल्ली -  देशपातळीवर होत असलेली विरोधकांची एकजूट, महागाई, बेरोजगारीवरून मतदारांमध्ये असलेली नाराजी यांचा फटका  नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला बसण्याची चिन्हे आहेत. एबीपी न्यूज-सीएसडीएस आणि लोकनीतीने संयुक्तरीत्या केलेल्या सर्वेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत कमालीची घट झाली आहे. तसेच मतदारांच्या नाराजीमुळे भाजपाच्या मतांच्या टक्केवारीमध्ये घट होण्याची चिन्हे आहे. 2014 साली स्वबळावर बहुमत मिळवणाऱ्या भाजपाला यावेळी मात्र स्वबळावर बहुमत मिळवता येणार नाही. मात्र असे असले तरी भारतीय जनता पक्ष एनडीएमधील मित्रपक्षांच्या पाठिंब्याच्या जोरावर केंद्रात सरकार स्थापन करण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपाप्रणित एनडीएला सद्यस्थितीत 274 जागा मिळतील, असा हा सर्व्हे म्हणतो. तर काँग्रेस प्रणित यूपीएला 164 आणि इतरांना 105 जागा मिळण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूज-सीएसडीएस आणि लोकनीतीने 19 राज्यांमध्ये केलेल्या या सर्व्हेनुसार लोकसभेमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील  रालोआला 274 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसप्रणित यूपीएला 164 एवढ्या जागा मिळतील. इतर पक्षांना 105 जागा मिळतील,  असा अंदाज  वर्तवण्यात आला आहे. मतांची टक्केवारी पाहिल्यास एनडीएला 37 टक्के, यूपीएला 31 टक्के आणि इतरांना 32 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतात भाजपाला मोठा धक्का उत्तर भारतात विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येथील लोकसभेच्या 151 जागांपैकी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 86 ते 94, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीला 23 ते 27 आणि इतरांना 33 ते 39 जागा मिळण्याची शक्यता आहे.  2014 साली उत्तर भारतात एनडीएला तब्बल 134 जागा मिळाल्या होत्या. तर यूपीएला 8 आणि इतरांना केवळ 9 जागा मिळाल्या होत्या.  पश्चिम आणि मध्य भारतातही भाजपाला नुकसान पश्चिम आणि मध्य भारतात लोकसभेच्या 118 जागा असून, येथे आज मतदान झाल्यास भाजपाला मोठा धक्का बसू शकतो. येथील 118 जागांपैकी भाजपा प्रणित एनडीएला 70 ते 78, काँग्रेस प्रणित यूपीएला 41 ते 47 जागा आणि इतरांना शून्य ते दोन जागा मिळू शकतात. 2014 साली भाजपाप्रणित एनडीएला 108 आणि काँग्रेसप्रणित यूपीएला 10 जागा मिळाल्या होत्या. दक्षिण भारतात यूपीएला आघाडी या सर्व्हेनुसार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए दक्षिण भारताही जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता आहे. दक्षिण भारताती सहा राज्यांमधील लोकसभेच्या 132 जागांपैकी केवळ 18 ते 22 जागा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसप्रणित यूपीएला मोठा फायदा होणार असून, त्यांना 65 ते 75 जागा मिळतील. तर अन्य पक्षांना 38 ते 44 जागा मिळण्याची शक्यता आहे.   पूर्व भारतात मात्र भाजपाला फायदापूर्व भारतात भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना फायदा होताना दिसत आहे. पूर्व भारतातील 142 जागांपैकी भाजपा प्रणित एनडीएला 86 ते 94 जागा आणि काँग्रेस प्रणित यूपीएला 22 ते 26 जागा आणि इरतांना 26 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक