शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
3
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
5
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
6
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
7
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
9
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
10
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
11
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
12
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
13
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
14
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
15
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
16
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
17
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
18
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
19
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
20
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा

"मोदींच्या जीवाला धोका, दाऊद इब्राहिम 5 कोटी देतोय..."; धमकीचा फोन करणारा कामरान कारागृहात, किती वर्षांची झाली शक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 11:05 IST

दरम्यान आरोपी कामरान खान मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळत, आरोपीने मानसिक आरोग्यासंदर्भातील आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कुठलेही पुरावे सादर केले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मारण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमम आपल्याला पैसे देऊ करत असल्याचा दावा करणाऱ्या आणि पोलिसांना धमकीचा फोन लावणाऱ्या एका व्यक्तीला मुंबईतील न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. एवढेच नाही तर, आरोपीसंदर्भात सहानुभूती दाखवणे योग्य नाही,  असेही न्यायालयाने म्हटले आहे.

येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (एस्प्लानेड कोर्ट) हेमंत जोशी यांनी २०२३ च्या खटल्यात २९ मार्च २०२५ रोजी हा निकाल दिला. दरम्यान आरोपी कामरान खान मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळत, आरोपीने मानसिक आरोग्यासंदर्भातील आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कुठलेही पुरावे सादर केले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला - न्यायालयाने खानला भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 505(2) (समाजात द्वेष, घृना अथवा द्वेष निर्माण करणे किंवा प्रोत्साहन देणे) आणि 506(2) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत दोषी ठरवले. तसेच त्याला दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह १०,००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

'दाऊद इब्राहिम पाच कोटी रुपये देतोय' -फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, आरोपीने नोव्हेंबर २०२३ मध्ये मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करून सरकारी जेजे हॉस्पिटलमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती. तसेच, मोदींच्या जीवाला धोका आहे, दाऊद इब्राहिम ५ कोटी रुपये देत आहे, त्याने मोदींची हत्या करण्यास सांगितले आहे," असेही म्हटले  होते. 'मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्यासाठी एक कोटी' -जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलेल्या दाऊद इब्राहिमचे लोक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्यासाठी आपल्याला १ कोटी रुपयांची ऑफर देत होते, असेही आरोपी म्हणाला होता, असेही न्यायालयात सांगण्यात आले.

 

टॅग्स :Courtन्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदीPoliceपोलिसjailतुरुंग