शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Narendra Modi : भ्रष्टाचार, घराणेशाहीवर नरेंद्र माेदींचा घणाघात; देशाच्या विकासासाठी ‘पंचप्राणां’वर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 6:58 AM

Independence Day : स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केले. आपल्या ८२ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी २५ वर्षांत देशाची वाटचाल कशी असायला हवी, याचा आराखडाच मांडला.

नवी दिल्ली : ‘भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही देशाच्या विकासात अडथळे ठरणारी दोन मोठी आव्हाने आहेत. ती केवळ राजकारणाच्या परिघापुरतीच मर्यादित नसून सर्वव्यापी आहेत. या दोन्ही दुष्प्रवृत्तींबाबत लोकांनी द्वेषभावना जागृत करावी आणि येत्या २५ वर्षांत भारत एक विकसित राष्ट्र म्हणून उदयाला यावे यासाठी ‘पंचप्राणां’वर लक्ष केंद्रित करावे,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशवासीयांना केले. 

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केले. आपल्या ८२ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी २५ वर्षांत देशाची वाटचाल कशी असायला हवी, याचा आराखडाच मांडला. विकसित राष्ट्र म्हणून उभे राहायचे असेल तर भ्रष्टाचार आणि घराणेशाही यांना मूठमाती द्यावी लागेल, असा आग्रह त्यांनी धरला. तसेच विकासाच्या मार्गावर गतिमान प्रवास करायचा असेल पाच सूत्रे (पंचप्राण) देशवासीयांनी अवलंबायला हवीत, असेही पंतप्रधान म्हणाले. 

विकसित भारतासाठी कटिबद्ध राहणे, कोणाच्या मनात गुलामीचा अंश असता कामा नये, आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान, विविधतेत असलेल्या आपल्या एकतेची जपणूक आणि नागरिक म्हणून - यात पंतप्रधान आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यांचाही समावेश - आपली सर्व कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे, ही पंचसूत्री मोदी यांनी देशवासीयांना दिली. 

स्वदेशी बनावटीच्या तोफांनी सलामीपंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला त्यावेळी रिवाजाप्रमाणे २१ तोफांची सलामी देण्यात आली. मात्र, यंदा ही सलामी स्वदेशी बनावटीच्या तोफांची होती. संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या या तोफांचे नाव ॲडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम (एटीएजीएस) असे आहे. 

जय अनुसंधान...पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये विविध क्षेत्रातील मूळ संशोधनाच्या गरजेवर अधिक भर दिला. जय जवान, जय किसान, जय विज्ञानबरोबरच आता ‘जय अनुसंधान’ असे म्हणायला हवे, असे मोदी यांनी नमूद केले. 

‘नारीशक्तीचा सन्मान करा’देशातील महिलाशक्तीबद्दलही मोदींनी गौरवोद्गार काढले. प्रत्येक स्त्रीचा मान राखला जायला हवा, त्यांना सन्मानाची वागणूक दिली जावी, असे सांगत नारीशक्तीचा सन्मान करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.  

स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांच्या वाटचालीत देशाच्या जीवनात अनेक चढ-उतार आले. सुख आणि दुःखाचे अनेक प्रसंग आपण पाहिले. यातूनही देशवासीयांनी मोठी कामगिरी केली. कधीच हार मानली नाही. संकल्प डळमळू दिले नाहीत. हीच भारताची खरी ताकद आहे. २०४७ मध्ये स्वातंत्र्याची १०० वर्षे आपण पूर्ण करू तेव्हा याच इच्छाशक्तीच्या बळावर विकसित राष्ट्र म्हणून जगासमोर उभे राहू. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिन