Delhi Election 2020 : नरेंद्र मोदी आजपासून प्रचारात उतरणार, दिल्ली विधानसभेचे चित्र बदलणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 11:57 AM2020-02-03T11:57:24+5:302020-02-03T12:01:17+5:30

दिल्लीत सत्तेवर असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांय्या नेतृत्वाखालील आपने मोठे आव्हान उभे केल्याने या निवडणुकीत भाजपाला मोठ्या प्रमाणात जोर लावावा लागत आहे.

Narendra Modi will campaign for BJP in Delhi Assembly election from Today | Delhi Election 2020 : नरेंद्र मोदी आजपासून प्रचारात उतरणार, दिल्ली विधानसभेचे चित्र बदलणार? 

Delhi Election 2020 : नरेंद्र मोदी आजपासून प्रचारात उतरणार, दिल्ली विधानसभेचे चित्र बदलणार? 

Next

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराने आता चांगलाच जोर धरला आहे. दिल्लीतील सत्ता हस्तगत करण्यासाठी सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि भाजपामध्ये चुरस दिसून येत आहे. दिल्लीत सत्तेवर असलेल्या आपने मोठे आव्हान उभे केल्याने या निवडणुकीत भाजपाला मोठ्या प्रमाणात जोर लावावा लागत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता भाजपाकडून प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत. मोदी आज आणि उद्या भाजपासाठी प्रचारसभा घेणार आहेत. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आतापर्यंत बऱ्यापैकी आघाडी घेतली आहे. मात्र आता भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. मोदींनी प्रचार सुरू केल्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीचे चित्र बदलेल अशी भाजपाच्या नेत्यांना अपेक्षा आहे. 



पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी भाजपाने आज दिल्लीतील अनेक वृत्तपत्रांमध्ये जाहीराती दिल्या असून, त्यामध्ये मोदींचा उल्लेख जननायक असा करण्यात आला आहे. मात्र मोदींच्या सभांमुळे केजरीवाल यांचा प्रभाव खरोखरच कमी होईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण 2015 मध्ये देखील नरेंद्र मोदींनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपासाठी जोरदार प्रचार केला होता. मात्र त्यावेळी त्याचा कुठलाही फायदा भाजपाला झाला नव्हता. उलट 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवत आम आदमी पक्षाने दिल्लीत सरकार स्थापन केले होते.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीतील पहिली सभा आज पूर्व दिल्लीमधील कडकडडूमा येथील सीबीडी ग्राऊंड परिसरात आयोजित होणार आहे. या सभेला भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार नाहीत. दिल्लीतील वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून मोदी हेलिकॉप्टरने सभास्थळी उपस्थित राहणार आहेत.  मोदींच्या या सभेचा प्रभाव उत्तर पूर्व दिल्लीतील 20 विधानसभा मतदारसंघांवर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Delhi Election 2020 : केजरीवाल यांनी दिलेली आश्वासने पाळले नाही: चंद्रकांत पाटील

Delhi Elections: स्वामींची भविष्यवाणी; भाजपा 41 जागा जिंकेल!

केजरीवालांचा पाकिस्तानशी संबंध जोडल्यानं आपचे खासदार संतापले; म्हणाले...

Delhi Election 2020 : 'आप'च्या 36 उमेदवारांवर गुन्हे दाखल

दरम्यान, नरेंद्र मोदींची दुसरी सभा मंगळवारी द्वारका येथे होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार गुरुवारी थांबणार आहे. तत्पूर्वी शेवटच्या चार दिवसांमध्ये भाजपाकडून आपली संपूर्ण ताकद पणाला लावण्यात येण्याची शक्यता आहे.  

Web Title: Narendra Modi will campaign for BJP in Delhi Assembly election from Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.