लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी हे दुबळे पंतप्रधान असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या द्विपक्षीय चर्चेत एच-१ बी व्हिसासह मुख्य मुद्द्यांना बगल देण्यात आली. एवढेच नाही, तर अमेरिकेने भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू-काश्मीरचा ‘भारत प्रशासित काश्मीर’ असा उल्लेख करूनही भारत सरकारने एका शब्दानेही आक्षेप नोंदविला नाही. मोदी यांचा अमेरिका दौरा म्हणजे निव्वळ फोटोपुरताच असल्याची परखड टीकाही राहुल आणि काँग्रेसने टिष्ट्वटद्वारे केली आहे.मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याशी संबंधित वृत्त आणि दोन छायाचित्र टिष्ट्वटवर जोडत मोदी हे दुबळे पंतप्रधान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोदी यांचा अमेरिका दौरा म्हणजे निव्वळ फोटोसाठी साधलेली संधी होय. विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्यासोबतच्या चर्चेत महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल देण्यात आली, अशी टीका काँग्रेसनेही आपल्या टिष्ट्वटर हँडलवर केली आहे.
नरेंद्र मोदी हे दुबळे पंतप्रधान
By admin | Updated: July 6, 2017 02:14 IST