शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

PM मोदींना जीवे मारण्याची धमकी, गृहमंत्री वळसे पाटलांचे पोलिसांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 08:54 IST

एनआयएच्या मुंबई शाखेला आला मेल

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्यासाठी २० किलो आरडीएक्ससोबत २० स्लीपर सेल तयार आहेत, अशा आशयाचा धमकीचा मेल एनआयएच्या मुंबई शाखेला आला आहे. या कटाचा पर्दाफाश होऊ नये म्हणून मी आत्महत्या करत आहे, असेही या मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार, तपास यंत्रणा अधिक तपास करत आहेत. धक्कादायक म्हणजे, धमकी देणाऱ्याने दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा दावाही केला आहे. याशिवाय या मेलमध्ये दोन कोटी लोकांनादेखील जीवे मारण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. तुम्ही मला थांबवू शकत असाल तर थांबवून दाखवा, असा इशारा या मेलमध्ये देण्यात आला आहे. मात्र, या मेलमध्ये किती तथ्य आहे, याबाबत अधिक तपास सुरू आहे. या ई-मेलनंतर तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. 

गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील यांनीही, याप्रकरणी योग्यपणे तपास करून कारवाई करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. या मेलची माहिती सर्व यंत्रणांना पाठवण्यात आली आहे. 

यापूर्वीही मिळाली होती धमकी... गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी ट्विटरवरून मिळाली होती. दीपक शर्मा नावाच्या ट्विटर खात्यावरून धमकी देण्यात आली होती. तसेच, जून २०२१ मध्ये २२ वर्षीय सलमान नावाच्या तरुणाने पोलिसांना फोनवरून पंतप्रधानांना  जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याला दिल्लीतील खजुरी खास पोलिसांनी अटक केली होती. 

राजस्थानमधून आरडीएक्स जप्त राजस्थान पोलिसांनी जयपूरमधून गुरुवारी १२ किलोग्रॅम आरडीएक्स, बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले. साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणण्याची योजना होती. तर, राजस्थान व मध्य प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाईत जुबेर, अल्तमास आणि सरफुद्दीन उर्फ सैफुल्ला नावाच्या या तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील