शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

"ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदींनी सरेंडर केलं’’ काँग्रेस असती तर.., युद्धविरामावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:00 IST

Rahul Gandhi News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अचानक केलेल्या युद्धविरामावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला. नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून सरेंडर केलं, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अचानक केलेल्या युद्धविरामावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला. नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून सरेंडर केलं, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं परराष्ट्र धोरण आणि पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते म्हणाले की, तिकडून डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि म्हणाले की, मोदीजी काय करत आहात? नरेंदर, सरेंडर, त्यानंतर जी हुजूर म्हणत नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याचं पालन केलं.

यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं उदाहरण देत राहुल गांधी म्हणाले की, तुम्हाला एक काळ माहिती असेल जेव्हा फोन नाही तर सातवं आरमार आलं होतं. मात्र तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, मला जे करायचं आहे ते मी करेन. हाच फरक आहे. यांचं व्यक्तिमत्त्वच असं आहे. यांना स्वातंत्र्याच्या काळापासून सरेंडरवालं पत्र लिहिण्याची सवय आहे. थोडासा दबाव आला की, हे लोक लगेच  सरेंडर करतात. काँग्रेस पार्टी सरेंडर करत नाही. महात्मा गांधीजी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल. ही मंडली सरेंडर करणारी नाही तर महाशक्तीसोबत लढणारी होती.

यावेळी राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बोचरी टीका केली. ते म्हणाले की, आज देशामध्ये विचारधारेची लढाई सुरू आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष आणि राज्यघटना आहे. तर दुसकडे भाजपा आणि संघ आहे जो या राज्यघटनेला संपवू इच्छित आहे. देशातील सर्व घटनात्मक संस्था  भाजपा आणि संघाच्या नियंत्रणाखाली गेल्या आहेत. त्यांनी सर्व संस्थांमध्ये आपल्या विचारांची माणसं बसवली आहेत. तसेच ते हळुहळू देशाचा गळा आवळत आहेत. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानUnited StatesअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पRahul Gandhiराहुल गांधी