शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

'काँग्रेसला 3 निवडणुकांमध्ये जितक्या जागा मिळाल्या, त्यापेक्षा जास्त आम्हाला मिळाल्या'- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 15:00 IST

NDA Meeting: "4 जूनपूर्वी हे लोक सातत्याने ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. मात्र 4 जूननंतर त्यांचे तोंड बंद झाले. पुढील 5 वर्ष कुणीही ईव्हीएमवर संशय घेणार नाही.''

Narendra Modi NDA Meeting : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील NDA ला बहुमत मिळाल्यानंतर शुक्रवारी(दि.7) दिल्लीत संसदीय पक्षाची बैठक झाली आणि त्यात सर्वांनी एकमताने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नेतेपदी निवड केली. राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावाला एनडीएच्या नेत्यांनी समर्थन दिलं आणि मोदींना पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसला शेलक्या शब्दात टोला लगावला.

10 वर्षांत 100 जागांचा आकडा गाठता आलेला नाहीयंदाच्या निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्यामुळे विरोधक सातत्याने टीका-टिप्पणी करत आहेत. त्या सर्व टीकांना पंतप्रधानांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले की, ''आम्हाला कमी जागेवरुन बोलले जात आहे, पण काँग्रेसला दहा वर्षांनंतरदेखील शंभर जागांचा आकडा गाठता आलेला नाही. 2014, 2019 आणि 2024 या तिन्ही निवडणुकांमध्ये मिळून जेवढ्या जागा त्यांना मिळाल्या, त्यापेक्षा जास्त जागा यंदा आम्हाला मिळाल्या आहेत. भविष्यात त्यांचा आकडा खूप वेगाने खाली येणार आहे. हे लोक आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानांना मान देत नाहीत,'' असा टोला मोदींनी यावेळी लगावला.

EVM वरुन विरोधकांवर निशाणा निवडणुकीपूर्वी विरोधक सातत्याने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत होते. याबाबत नरेंद्र मोदी म्हणाले की, "4 जूनपूर्वी हे लोक (इंडिया आघाडी) सातत्याने ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. या लोकांचा भारतातील लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडाला होता. मात्र 4 जूनच्या संध्याकाळपर्यंत त्यांचे तोंड बंद  झाले. ईव्हीएमने त्यांना गप्प केले. हीच भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. आता मला विश्वास आहे की पुढील 5 वर्ष कुणीही ईव्हीएमवर संशय घेणार नाही,'' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

देशाला सुशासन दिले आहे"एनडीए सरकारने देशाला सुशासन दिले आणि एक प्रकारे एनडीए हा शब्द सुशासनाचा समानार्थी बनला आहे. गरीब कल्याण आणि सुशासन हे आपल्या सर्वांच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला बहुमत देऊन सरकार चालवण्याची संधी दिली, त्यादृष्टीने एकदिलाने प्रयत्न करणे आणि देशाला पुढे नेण्यासाठी कोणतीही कसर सोडू न देणे, ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे," असंही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसEVM Machineएव्हीएम मशीन