शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी माझे हीरो - फोर्डचे सीईओ

By admin | Updated: June 13, 2014 14:50 IST

नरेंद्र मोदी हे माझे हीरो असून ते भारताचे पंतप्रधान म्हणून ते खूप मोठी कामगिरी बजावतील असा विश्वास अमेरिकी बडी कंपनी फोर्डचे सीईओ अ‍ॅलन मुलाली यांनी व्यक्त केला आहे.

ऑनलाइन टीम
चेन्नई, दि. १३ - नरेंद्र मोदी हे माझे हीरो असून ते भारताचे पंतप्रधान म्हणून ते खूप मोठी कामगिरी बजावतील असा विश्वास अमेरिकी बडी कंपनी फोर्डचे सीईओ अ‍ॅलन मुलाली यांनी व्यक्त केला आहे. मुलाली लवकरच निवृत्त होत असून एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गेली अनेक वर्षे मोदींची भाषणे आपण ऐकत असून त्यांचं कामही बघितलं आहे. आर्थिक विकासावर त्यांचा भर असून ते भारतासाठी फार महत्त्वाची कामगिरी बजावतील असे मुलाली म्हणाले. आठ वर्षांपूर्वी १७ अब्ज डॉलर्सनी तोट्यात असलेल्या फोर्डची सूत्रे हातात घेतलेले मुलाली अत्यंत कार्यक्षम अधिकारी मानले जातात आणि उद्योगविश्वामध्ये त्यांचा दबदबा आहे.
मोदींचा भर या पायाभूत सुविधांवर असून ती सगळ्यात महत्त्वाची बाब असल्याचे मुलाली म्हणाले. भारत हा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेला असून लहान व मध्यम आकाराची वाहने तयार करण्यात व निर्यात करण्यात भारत अत्यंत मोलाची भूमिका बजावू शकतो. भारताने उत्पादन क्षेत्रावर भर द्यायला हवा असा सल्ला या उद्योदजगतातील दिग्गजाने दिला असून त्यामुळे रोजगार निर्माण होतो तसेच सगळ्यांसाठी आर्थिक वाढ होते असे सांगितले.
गुजरातमधला आपला अनुभव खूपच चांगला असून उद्योगांना तिथे प्रचंड प्रमाणात प्रोत्साहन दिले जात असल्याचे मुलाली म्हणाले. गुजरात सरकारने आम्हाला सतत सहकार्य केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. विशेष म्हणजे मुलाली व मोदी यांची एकदाही प्रत्यक्ष भेट झाली नसूनही केवळ त्यांच्या बघितलेल्या कामामुळे ते मोदींच्या प्रेमात पडले आहेत व मोदींना ते आपला हीरो मानतात.