पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदा येथे ३२५० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचं भूमिपूजन केलं. यावेळी एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर (TMC) जोरदार निशाणा साधला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "जगातील अनेक समृद्ध देश आपल्या देशातून अवैध घुसखोरांना बाहेर काढत आहेत. आज बंगालमधूनही अनेक घुसखोरांना बाहेर काढण्याची गरज आहे. पण टीएमसी या घुसखोरांना बाहेर काढणार का? टीएमसी तर त्यांना आपले 'व्होटर' (मतदार) बनवत आहे. बंगालमध्ये भाजपाचे सरकार बनवा, आम्ही या घुसखोरांना देशाबाहेर काढू. TMC म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष."
"विकास करणारं भाजप सरकार"
घुसखोरीमुळे बंगालमधील लोकसंख्येचं गणित बिघडल्याचा दावा करत पंतप्रधान म्हणाले, "या घुसखोरांमुळे आज बंगालमध्ये अनेक ठिकाणी लोकसंख्येचा समतोल बिघडला आहे. भाजपचे सरकार आल्यावर एका-एका घुसखोराला निवडून बाहेर पाठवू. बंगालच्या जनतेचे कल्याण तेव्हाच होईल, जेव्हा येथे अडथळे निर्माण करणारे टीएमसी सरकार नसेल, तर विकास करणारं भाजप सरकार असेल."
"मालदा हे प्राचीन संस्कृती आणि राजकारणाचे केंद्र आहे. हे शहर आपल्या आम्रफलांसाठी, लोकसंगीतासाठी आणि वैचारिक चेतनेसाठी ओळखले जाते. पूर्व भारताला दशकानुदशके द्वेषाचं राजकारण करणाऱ्यांनी जखडून ठेवलं होतं. भाजपने या राज्यांना त्यांच्या तावडीतून मुक्त केलं आहे. पूर्व भारतातील राज्यांचा विश्वास आज फक्त भाजपावरच आहे."
"बंगालमध्ये विकासाची गंगा वाहणार"
"त्रिपुरा, आसाम आणि बिहारनंतर आता बंगालमध्येही विकासाची गंगा वाहणार आहे. देशात भाजपाने सुशासन आणि विकासाचे मॉडेल स्थापित केलं आहे. काल महाराष्ट्रातही भाजपाला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. जगातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या बीएमसीमध्ये (BMC) पहिल्यांदाच भाजपाला विक्रमी विजय मिळाला आहे. हे सिद्ध करतं की देशातील मतदार आणि 'जनरेशन-झेड'चा (Gen-Z) भाजपावर पूर्ण विश्वास आहे" असं मोदींनी म्हटलं आहे.
बंगालला वंदे भारतची भेट
या कार्यक्रमात बंगालच्या विकासाशी संबंधित अनेक प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आले. यात 'मेड इन इंडिया' असलेल्या 'वंदे भारत स्लीपर' ट्रेनचाही समावेश आहे. देशातील पहिली वंदे भारत ज्या मार्गावरून सुरू होत आहे, तो आपला बंगाल आहे आणि मालदा हे त्याचं एक महत्त्वाचे स्टेशन आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
"प्रत्येकाकडे स्वतःचं पक्कं घर असावं"
"माझी इच्छा आहे की, बंगालमधील प्रत्येकाकडे स्वतःचं पक्कं घर असावं, माता-भगिनींना मोफत रेशन मिळावं. हा तुमचा हक्क आहे, पण टीएमसीचे लोक बंगालमधील गरीब भावंडांचे शत्रू बनले आहेत. ते फक्त स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यात मग्न आहेत. देशात आयुष्मान भारत योजना लागू आहे, पण बंगाल हे एकमेव राज्य आहे जिथे ही योजना लागू होऊ दिली जात नाही" असं ही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
Web Summary : PM Modi attacked TMC in West Bengal, calling it corrupt and accusing it of turning infiltrators into voters. He promised to remove infiltrators if BJP wins and criticized TMC for blocking development. He also highlighted central schemes denied to Bengal.
Web Summary : पश्चिम बंगाल में पीएम मोदी ने टीएमसी पर हमला बोला, उन्हें भ्रष्ट बताया और घुसपैठियों को मतदाता बनाने का आरोप लगाया। उन्होंने भाजपा के जीतने पर घुसपैठियों को हटाने और विकास को बाधित करने के लिए टीएमसी की आलोचना की। उन्होंने बंगाल को केंद्रीय योजनाओं से वंचित रखने की बात भी कही।