शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 18:40 IST

"आपण एकदा काही कामासाठी पंतप्रधान मोदींना मेसेज केला होता आणि त्याच मेसेजवर त्यांनी आपले काम करून दिले..."

संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जबरदस्त सभा सुरू आहेत. ते आपल्या सभेत 'गॅरंटी' हा शब्द सातत्याने वापरत आहेत. यातच, गुजरातचे माजी विरोधी पक्षनेते अर्जुन मोधवाडिया यांनी मोदींचे तोंड भरून कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी जो शब्द देतात तो नक्की पाळतात, असे मोधवाडिया यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी त्यांचा एक जुना अनुभवही शेअर केला. आपण एकदा काही कामासाठी पंतप्रधान मोदींना मेसेज केला होता आणि त्याच मेसेजवर त्यांनी आपले काम करून दिले, असे मोधवाडिया यांनी सागितले.

जुन्या गोष्टी विसरत नाहीत PM मोदी - आता भाजपमध्ये सामील झालेले अर्जुन मोधवाडिया म्हणाले, पंतप्रधान मोदी जुन्या गोष्टी कधीच विसरत नाहीत. त्यांनी केवळ माझ्या एका मेसेजवर माझे काम करून दिले होते. पंतप्रधान मोदी हे मोठ्या मनाचे नेते आहेत. ते त्यांच्या पक्षातील नेत्यांबरोबर विरोधकांचेही व्यवस्थित ऐकतात. एका मुलाखतीत अर्जुन मोधवाडिया म्हणाले, मी गुजरातचा विरोधी पक्षनेता असताना, पक्षाच्या वतीने भूमिका मांडत असे. तेव्हा माझी जी भूमिका असायचा, तिला बहुतेक वेळा स्थान देण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करत होते. तेव्हा ते म्हणायचे की, आपण विरोधी पक्षाच्या बाजूने बोलताना आमचे सरकार तुमचे म्हणणे नोट करते आणि जे आमलात आणण्यासारखे असेल ते आमलातही आणते.

एयरपोर्टचा रनवे वाढविण्याची केली होती मागणी - एका जुना किस्सा सांगताना मोधवाडिया म्हणाले, पोरबंदर विमानतळावरील टर्मिनलमध्ये एका नव्या इमारचीचे उद्घाटन करण्यासाठी तत्कालीन विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल आले होते. नरेंद्र मोदी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मी आमदार तथा विरोधी पक्षनेता म्हणून कार्यक्रमात सहभागी झालो होतो. तेव्हा मी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मागणी केली होती की, आमच्या विमानतळाची धावपट्टी 1300 मीटर आहे, यामुळे मोठी विमाने येथे उतरू शकत नाहीत. ही धावपट्टी 2,600 मीटर करण्यात यावी. यावर पटेल म्हणाले होते, नरेंद्र मोदी यांनी आम्हाला जमीन दिली, तर आम्ही करू. त्याचवेळी आम्ही आपल्याला धावपट्टीसाठी जमीन देऊ, असे नरेंद्र मोदी यांनी सर्वांसमोर सांगितले होते.पीएम बनने पर याद दिलाया वादा -मोधवाडिया पुढे म्हणाले, त्यांनी (नरेंद्र मोदी) तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिली. मात्र, 2012 नंतर मी आमदार नव्हतो. त्यानंतर नरेंद्र मोदीही पंतप्रधान झाले. यानंतर हा विषय बाजूला पडला. जमीन इतरत्र देण्यात आली. त्यानंतर मी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपानी यांना फोन केला. त्यांना नरेंद्र मोदींच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली. यानंतर, विजय रुपानी यांनी पीएम मोदींना फोन केला आणि सांगितले की अर्जुन मोधवाडिया यांनी आपल्याला मैसेज दिला आहे की, आपण सर्वांसमोर अर्जुन मोधवाडिया पुढे म्हणाले की, त्यांनी (नरेंद्र मोदी) तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. पण, २०१२ नंतर मी आमदार नव्हतो. त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. यानंतर ते बाजूला करण्यात आले. जमीन इतरत्र देण्यात आली. त्यानंतर मी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपानी यांना फोन केला. त्यांना नरेंद्र मोदींच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली. यानंतर विजय रुपानी यांनी पीएम मोदींना फोन केला आणि सांगितले की, अर्जुन मोधवाडिया यांनी आपल्यासाठी मेसेज दिला आहे की, आपण सर्वांसमोर पोरबंदरमध्ये धावपट्टी विस्तारासंदर्भात आश्वासन दिले होते.

यानंतर, पंतप्रधान मोदींनी तातडीने धावपट्टीचा विस्तार करण्याचे आदेश दिले. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी केवळ एका मेसेजवर माझे काम केले. यावरून पंतप्रधान मोदी किती मोठ्या मनाचे आहेत हे सिद्ध होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्जुन मोधवाडिया यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४