केंद्र सरकारचं 100 दिवसांच्या कामाचं रिपोर्ट कार्ड येणार; मोदींनी सांगितला 'हा' प्लॅन 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 08:59 AM2019-07-29T08:59:57+5:302019-07-29T09:10:47+5:30

पंतप्रधान कार्यालयाने मंत्र्यांकडूनही त्यांच्या खात्यातील मोठ्या प्रकल्पांची यादी मागविली आहे

Narendra Modi Govt Will Represent Report Card On 100th Day | केंद्र सरकारचं 100 दिवसांच्या कामाचं रिपोर्ट कार्ड येणार; मोदींनी सांगितला 'हा' प्लॅन 

केंद्र सरकारचं 100 दिवसांच्या कामाचं रिपोर्ट कार्ड येणार; मोदींनी सांगितला 'हा' प्लॅन 

Next

नवी दिल्ली - मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कामाचं रिपोर्ट कार्ड जारी करण्यात येणार आहे. या रिपोर्टमध्ये नवीन प्रकल्प तसेच महत्वाकांक्षी प्रकल्पाचे अपडेट दिले जाणार आहे. 

पंतप्रधान कार्यालयाकडून सर्व मंत्रालयाच्या सचिवांना आपल्या विभागाच्या कामांचा अहवाल तयार करण्यासाठी सांगितले आहे. त्यामध्ये तीन गोष्टींवर जास्त लक्ष देण्यात आलं आहेत. त्यात एखादी योजना अथवा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोणतं लक्ष्य ठरविण्यात आलं आहे. प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी काय उपाययोजना आखली आहे. प्रकल्प काय, केव्हा आणि कधी पूर्ण होईल याची संपूर्ण माहिती देणं बंधनकारक आहे. मोदी सरकारअंतर्गत प्रत्येक प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी 10 ग्रुप ऑफ सेक्रेटरी बनविले आहे. ते वारंवार पंतप्रधान कार्यालयाशी संपर्कात राहणार आहेत. 

तसेच पंतप्रधान कार्यालयाने मंत्र्यांकडूनही त्यांच्या खात्यातील मोठ्या प्रकल्पांची यादी मागविली आहे. ती यादी महिनाभरात पूर्ण होईल. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे की, दुसऱ्या टर्ममध्ये प्रत्येक महिन्याला देशाच्या नागरिकांना पूर्ण झालेला प्रकल्पाचे अपडेट दिले जावे. तसेच सर्व मंत्रालयाकडून गुड गर्व्हनन्सचा वेगळा गट बनवून सरकारच्या चांगल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम केलं जावं असं सांगण्यात आलं आहे. 

संबंधित मंत्रालयाकडून योजनांची माहिती त्यासाठी लागणारा खर्च आणि पैसे कुठून येणार याची माहिती द्यावी लागणार आहे. योजना किंवा प्रकल्प सुरु केल्यानंतर त्यामुळे किती रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील यासाठी वेगळा कॉलम देण्यात आला आहे. जे मंत्रालय रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी चांगली योजना आणेल त्यांच्या प्रकल्पांना प्राधान्याने मान्यता दिली जाईल असं सांगण्यात आलं आहे. 

देशात वाघांची संख्या किती याची माहिती मिळणार 
देशात सध्या वाघांची संख्या किती याची माहिती सोमवारी मिळणार आहे. वाघांची संख्या किती याचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करतील. प्रत्येक चार वर्षानंतर वाघांची संख्या जाहीर केली जाते. याआधी 2006, 2010 आणि 2014 मध्ये वाघांच्या संख्येची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. 
 

Web Title: Narendra Modi Govt Will Represent Report Card On 100th Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.