शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा जिंकण्यासाठी मोदी घेणार 'कालिया'ची मदत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 11:19 IST

लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकारच्या हालचाली

नवी दिल्ली: तीन राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे सत्ता गमवावी लागल्यानंतर आता मोदी सरकार कृषी क्षेत्रासाठी विविध योजना सुरू करण्याच्या विचारात आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आता सरकार राज्य सरकारांनी राबवलेल्या योजनांकडे गांभीर्यानं पाहण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणाऱ्या राज्य सरकारच्या योजना देशपातळीवर राबवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. ओदिशा सरकारकडून कालिया (कृषक असिस्टन्स फॉर लायव्हलीहूड अँड इन्कम ऑग्मेंटेशन) योजना राबवण्यात आली आहे. हीच योजना नव्या अवतारात लागू करण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. कालिया योजनेचा लवकरात लवकर अभ्यास करुन लोकसभा निवडणुकीआधी नव्या योजनेचा आराखडा तयार करण्याच्या सूचना केंद्रीय कृषी मंत्रालयातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. छोटे शेतकरी आणि भूमीहिनांच्या दृष्टीकोनातून योजना तयार करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ओदिशा सरकारनं गेल्या 31 डिसेंबरला कालिया योजना लागू केली. या योजनेचा फायदा राज्यातील 92 टक्के शेतकऱ्यांना झाला. ओदिशा सरकार कालिया योजनेवर येत्या 3 वर्षात 10 हजार 180 कोटी रुपये खर्च करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून लहान शेतकरी आणि भूमीहिनांना अर्थसहाय्य करण्यात येतं. याशिवाय त्यांच्या पिकाला चांगला भावदेखील दिला जातो. शेतकऱ्यांची गरिबी दूर करुन त्यांना समृद्ध करण्याच्या हेतून ओदिशा सरकारनं कालिया योजनेची सुरुवात केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाFarmerशेतकरीOdishaओदिशा