शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार-2 लवकरच 'हे' पाच मोठे निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 23:18 IST

अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा बहुमत मिळवलं. त्यामुळे मोदी सरकार लवकरच येत्या काही आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात किंवा त्याआधीच सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना निवृत्ती वेतनवयाची साठी ओलांडलेल्या अल्प भूधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षेच्या अंतर्गत निवृत्ती वेतन देण्याचं आश्वासन भाजपानं संकल्प पत्रात दिलं होतं. या योजनेची घोषणा येत्या अर्थसंकल्पात केला जाण्याची शक्यता आहे. सर्व शेतकऱ्यांना दर वर्षी 6 हजार रुपयेगेल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या अंतर्गत 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दर वर्षी 6 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला. यानंतर निवडणूक आली. यानंतर लोकसभा निवडणुकीवेळी भाजपानं संकल्प पत्र जाहीर केलं. भाजपा सरकार पुन्हा सत्तेत आल्यास सर्व अल्प भूधारक शेतकऱ्यांना दर वर्षी 6 हजारांची मदत दिली जाईल, असं आश्वासन दिलं. याबद्दलची घोषणा अर्थसंकल्पात केली जाऊ शकते. लहान दुकानदारांना निवृत्ती वेतनसरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पात छोट्या दुकानदारांचा समावेश प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेत करू शकतं. या योजनेच्या माध्यमातून लहान दुकानदारांना निवृत्ती वेतन दिलं जाईल. भाजपानं संकल्प पत्रात याबद्दलचं आश्वासन दिलं होतं. जीएसटीच्या टप्प्यात महत्त्वाचे बदलजीएसटीच्या टप्प्यांमध्ये सरकारकडून बदल केले जाऊ शकतात. अर्थ मंत्री अरुण जेटलींनी काही महिन्यांपूर्वी एका ब्लॉगमधून याबद्दलचे संकेत दिले होते. देशात 0, 5 आणि स्टँडर्ड स्लॅब असू शकतात, असं जेटलींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं. 'भविष्यात 12 आणि 18 टक्क्यांत्या स्लॅबऐवजी एकच स्टँडर्ड स्लॅब आणला जाऊ शकतो. हा नवा स्लॅब या दोन्हींच्या दरम्यानचा असेल,' असं जेटलींनी ब्लॉगमध्ये म्हटलं होतं.  सर्वांना कर्जमाफी येत्या काही दिवसात मोदी सरकार युनिव्हर्सल डेब्ट रिलीफ स्कीमची (सर्वांना कर्जमाफी योजना) घोषणा करू शकतं. या योजनेच्या माध्यमातून अल्प भूधारक शेतकरी, कारागीर, लहान व्यावसायिक आणि अन्य क्षेत्रातील कमी उत्पन्न असलेल्यांना कर्जमाफी दिली जाऊ शकते. या कर्जमाफीचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी एक विशिष्ट पात्रता निश्चित केली जाईल. वार्षिक उत्पन्न 60 हजार रुपये, 35 हजार रुपयांचं कर्ज शिल्लक असलेल्यांना या योजनेतून लाभू मिळू शकतो.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाFarmerशेतकरीGSTजीएसटी