नवी दिल्ली : केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर महिनाभराने मोदी सरकारने राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या असून मध्यप्रदेशच्या राज्यपाल असलेल्या आनंदीबेन पटेल यांना उत्तर प्रदेशच्य़ा राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. गेली पाच वर्षं राम नाईक हे उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते. त्यांच्याकडे पक्षाने अद्याप कुठलीही नवी जबाबदारी दिलेली नाही. पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्येही नवे - आपल्या विश्वासातील राज्यपाल नेमून मोदी-शहांनी दूरदृष्टीचा प्रत्यय दिला आहे.
तर मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हमून लालजी टंडन यांची नियुक्ती केली आहे. ते बिहारचे राज्यपाल होते. तर बिहारसाठी फागू चौहाण यांची नियुक्ती केली आहे. नागालँडच्या राज्यपालपदी आरएन रवी यांनी नियुक्ती केली आहे. हे सर्वजण जेव्हा पदभार स्वीकारतील तेव्हापासून राज्यपाल होणार आहेत.