नरेंद्र मोदींनी केला दिल्ली मेट्रोने प्रवास!

By Admin | Updated: April 26, 2015 01:48 IST2015-04-26T01:48:48+5:302015-04-26T01:48:48+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प्रथमच दिल्ली मेट्रोने प्रवास केला. सुरक्षा व्यवस्थेमुळे लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी मेट्रोने जाण्याचा निर्णय घेतला असे सूत्रांनी सांगितले.

Narendra Modi condoles Delhi Metro travel! | नरेंद्र मोदींनी केला दिल्ली मेट्रोने प्रवास!

नरेंद्र मोदींनी केला दिल्ली मेट्रोने प्रवास!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प्रथमच दिल्ली मेट्रोने प्रवास केला. सुरक्षा व्यवस्थेमुळे लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी मेट्रोने जाण्याचा निर्णय घेतला असे सूत्रांनी सांगितले. मेट्रोच्या प्रवासाने आपल्याला अत्यानंद मिळाल्याचे टिष्ट्वटही त्यांनी नंतर केले.
पंतप्रधानांना राष्ट्रीय गुप्तचर अकादमीच्या समारंभात सहभागी होण्यासाठी जायचे होते. यासाठी त्यांनी धौलाकुंआ ते द्वारका हा प्रवास मेट्रोने केला.
टिष्ट्वटरवर आपल्या या प्रवासाचा अनुभव सांगताना मोदी म्हणाले, मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी अनेकदा मला मेट्रो प्रवासाचा अनुभव घेण्याबाबत सुचविले होते. आज मला ती संधी मिळाली. खरेच हा प्रवास फार आनंददायी होता. याबद्दल मी दिल्ली मेट्रो आणि श्रीधरन यांचे धन्यवाद मानतो. श्रीधरन हे दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाचे (डीएमआरसी) माजी प्रमुख आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Narendra Modi condoles Delhi Metro travel!