शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

श्रीपाद नाईक पंतप्रधान मोदींच्या फोनच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 20:37 IST

श्रीपाद नाईक पंतप्रधान मोदींच्या फोनच्या प्रतीक्षेत

पणजी : केंद्रीय आयुष मंत्री म्हणून यापूर्वी काम केलेले उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक हे अजुनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोनच्या प्रतीक्षेत आहेत. नाईक यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश होईल की नाही, हे पंतप्रधान मोदी यांचा त्यांना फोन आल्यानंतरच कळून येणार आहे.लोकमतने नाईक यांच्याशी बुधवारी संपर्क साधला. नाईक म्हणाले, की मी दिल्लीत आहे पण अजून तरी मला मंत्रिमंडळातील समावेशाबाबत फोन आलेला नाही. मी कधीच मंत्रीपद मिळावे म्हणून लॉबिंग केले नाही किंवा तशी मागणीही करत राहिलो नाही. यावेळी तर मागणी करण्याचा प्रश्नच येत नाही. आमचे काम सर्वांनाच ठाऊक आहे. मला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले असल्याचे कळवणारा अधिकृत संदेश जर आला तर मी निश्चितच तसे जाहीर करेन.दरम्यान, नाईक हे पाचव्यांदा उत्तर गोव्यातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. 1999 सालापासून सलग पाचवेळा लोकसभा निवडणूक जिंकून नाईक यांनी उत्तर गोव्यात  विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून दिल्लीत विविध खाती सांभाळली आहेत. त्यांना मंत्रिपद द्यायला हवे, असे गोवाभाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांना व गोवा मंत्रिमंडळाच्याही काही सदस्यांना वाटते. मात्र यावेळी लॉबिंग करायचे नाही, कारण लॉबिंग करणे चुकीचे ठरेल अशी प्रत्येकाची भावना बनली आहे.

सर्व मंत्री दिल्लीतमुख्यमंत्री सावंत यांच्यासह गोवा मंत्रिमंडळातील सर्व मंत्री व विविध सरकारी महामंडळांचे चेअरमन आणि भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आज दिल्लीला जाणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण सर्व मंत्र्यांना आलेले आहे. गोव्याहून एकूण 45 जण शपथविधी सोहळ्य़ाचे प्रत्यक्ष साक्षीदार होतील. यात भाजपच्या मंत्र्यांसह गोवा फॉरवर्डचे मंत्री व दोन अपक्ष मंत्र्यांचाही समावेश आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाgoaगोवा