Cabinet Reshuffle: जावडेकर 'आऊट', राणे 'इन'; शिवसेनेला थेट भिडणाऱ्या नेत्याला पंतप्रधान मोदींकडून 'पॉवर'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 06:29 PM2021-07-07T18:29:46+5:302021-07-07T18:30:55+5:30

Narendra Modi Cabinet Reshuffle: भाजप खासदार नारायण राणेंनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

Narendra Modi Cabinet Reshuffle bjp mp narayan rane takes oath as cabinet minister | Cabinet Reshuffle: जावडेकर 'आऊट', राणे 'इन'; शिवसेनेला थेट भिडणाऱ्या नेत्याला पंतप्रधान मोदींकडून 'पॉवर'

Cabinet Reshuffle: जावडेकर 'आऊट', राणे 'इन'; शिवसेनेला थेट भिडणाऱ्या नेत्याला पंतप्रधान मोदींकडून 'पॉवर'

Next

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराला सुरुवात झाली आहे. खासदार नारायण राणे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सध्या राष्ट्रपती भवनात ४३ नेत्यांचा शपथविधी संपन्न होत आहे. यामध्ये नारायण राणेंना सर्वात आधी मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यानंतर  सर्वानंद सोनोवाल यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राणे आणि सोनोवाल माजी मुख्यमंत्री असल्यानं त्यांना सर्वप्रथम शपथ दिली गेली.


पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी थोड्याच वेळापूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याचं एक कॅबिनेट मंत्रिपद कमी झालं. मात्र त्यानंतर लगेचच नारायण राणेंनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे महाराष्ट्राला मिळालेली तीन कॅबिनेट मंत्रिपदं कायम आहेत. नितीन गडकरी आणि पियूष गोयल यांच्या रुपात महाराष्ट्राकडे दोन कॅबिनेट मंत्रिपदं आहेत.

यादीत पहिलं स्थान अन् पहिल्या रांगेचा मान; महाराष्ट्रातील नेत्याची दिल्लीत चर्चा

राणेंना मंत्रिपद देण्यामागची राजकीय गणितं काय?
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय पेटला आहे. यावरून भाजप महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं निशाणा साधत आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजातील मोठे नेते असलेल्या राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. राणे शिवसेनेला सातत्यानं लक्ष्य करत असतात. कोकणात शिवसेनेची ताकद आहे. राणेंनी मंत्रिपदाची रसद देऊन कोकणात शिवसेनेला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

महाराष्ट्रातील आयारामांची चांदी; काँग्रेस, राष्ट्रवादीतून आलेल्या तिघांना मोदी मंत्रिमंडळात संधी

यादीत पहिलं स्थान अन् पहिल्या रांगेचा मान
पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या बैठकीत आणि त्यानंतर पुढे आलेल्या यादीत नारायण राणेंचं नाव लक्षवेधी ठरलं आहे. पंतप्रधान मोदी संभाव्य मंत्र्यांशी संवाद साधत असल्याचे दोन फोटो समोर आले आहेत. यापैकी एक फोटो समोरून काढण्यात आलेला आहे. यात सर्व संभाव्य मंत्री दिसत आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्क असल्यानं सर्व उपस्थितांचे चेहरे नीट दिसत नाहीत. मात्र पहिल्या रांगेतील सर्वांचे चेहरे ओळखू येत आहेत. मोदींच्या उजव्या बाजूला पहिल्याच रांगेत भाजप खासदार नारायण राणे आहेत. राणेंना पहिल्याच रांगेत स्थान देण्यात आल्यानं त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

मोदींनी बोलावलेली बैठक संपताच थोड्याच वेळात ४३ जणांची यादी पुढे आली. या यादीतही नारायण राणेंचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सर्बांनंद सोनोवोल, विरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य शिंदे, रामचंद्र प्रसाद सिंग, अश्विनी वैष्णव, पशुपति कुमार पारस, किरण रिजीजू, राजकुमार सिंह, हरदीप सिंग पुरी आणि इतरांची नावं आहेत. या यादीत राणेंसोबतच महाराष्ट्रातील आणखी ३ नेत्यांची नावं आहेत. मात्र त्यांची नावं बरीच खाली आहेत. 

Web Title: Narendra Modi Cabinet Reshuffle bjp mp narayan rane takes oath as cabinet minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.