शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बाबरी मशीद बांधण्यासाठी मोदी पंतप्रधान झालेत का?- प्रवीण तोगडिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 17:07 IST

तोगडिया यांनी राम मंदिर उभारणीसंदर्भात वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.

अहमदाबाद: बाबरी मशीद बांधण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत काय? असा सवाल तोगडिया यांनी केला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर प्रवीण तोगडियादेखील राम मंदिर उभारणीसाठी आक्रमक झाले आहेत. त्यांनी राम मंदिर उभारणीसंदर्भात वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिर बांधणीच्या मागणीसाठी तोगडिया मंगळवारपासून (17 एप्रिल) बेमुदत उपोषणाला बसले आहेत. प्रवीण तोगडिया यांनी सुरू केलेल्या उपोषणाला अहमदाबादेत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज दुपारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तोगडिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्ला चढवला. 'हिंदुंनी प्राण त्याग केला. रक्त सांडवले. त्यामुळे तुम्हाला सत्ता मिळाली आहे. पोलिसांना सांगून ३०० हिंदुंना ठार केले होते, हे विसरलात का?, असा सवाल तोगडिया यांनी यावेळी केला. आजही गुजरातमधील १२०० हून अधिक हिंदू जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. शेकडो हिंदुंचं बलिदान आणि हजारो हिंदुंचा तुरुंगवास तुम्हाला सत्तेत बसविण्याचा मार्ग होता का? ज्यांनी राम मंदिर बांधण्यासाठी प्राण दिले, ज्यांनी राम मंदिरासाठी तुरुंगवास भोगला, त्यांच्या बायका आज रडत आहेत, याचं तुम्हाला भान आहे का? असा सवालही तोगडिया यांनी मोदींना विचारला.प्रवीण तोगडिया यांनी 32 वर्षांपर्यंत विहिंपचे अध्यक्षपद भूषवले आहे. दरम्यान, तोगडिया यांनी विहिंपचे नवीन अध्यक्ष एस.कोकजे यांनाही आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा आग्रह केला आहे. कोकजे यांनी एक तर उपोषणामध्ये सहभागी व्हावं किंवा त्यांनी राम मंदिर निर्माणासंबंधी संसदेत विधेयक आणण्यासाठी दबाव निर्माण करावा, अशी मागणी तोगडिया यांनी केली आहे. 

तोगडिया यांनी असेही सांगितले की,विश्व हिंदू परिषदेने म्हटले होते, आम्हाला (संघ परिवार) संसदेत बहुमत मिळाले तर आम्ही विधेयक संमत करून राम मंदिर उभारण्याचा मार्ग सुकर करण्यात येईल. परिषदेने लोकांना अयोध्येत कार सेवा करताना प्राण पणाला लावण्याचे आवाहन केले होते. सुमारे 60 लोकांनी आपले प्राण त्यासाठी गमावले. गुजरातमधील हजारो जणांनी यासाठी आपले योगदान दिले होते.  

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना तोगडिया म्हणालेत की, ''सीमेवर जवान सुरक्षित नाहीत, शेतकरी आत्महत्या करत आहेत. आमच्या मुली स्वतःच्या घरात सुरक्षित नाहीत आणि पंतप्रधान परदेश दौऱ्यावर गेले आहेत''. दरम्यान, विहिंपच्या नव्या कार्यकारिणीत तोगडिया समर्थकांना स्थान देण्यात आलेले नाही. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरpraveen togadiaप्रवीण तोगडियाNarendra Modiनरेंद्र मोदी