शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

70 वर्षांत गरिबांची बँक खाती उघडू न शकणारे खात्यात पैसे काय जमा करणार? मोदींचा काँग्रेसला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 13:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार अभियानाची सुरुवात आज मीरत येथील जनसभेपासून केली. त्यावेळी मोदींनी विविध प्रश्नांवरून विरोधकांना लक्ष्य केले. 

मीरत (उत्तर प्रदेश) - जे लोक गेल्या 70 वर्षांत सर्वसामान्य गरिबांचे साधे बँक खाते उघडू शकले नाहीत ते गरीबांच्या बँका खात्यात पैसे काय जमा करणार, असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. आज उत्तर प्रदेशमधील मीरत येथे आयोजित केलेल्या सभेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठीच्या आपल्या प्रचार अभियानाला सुरुवात केली. यावेळी मोदींनी विविध प्रश्नांवरून विरोधी पक्षांना लक्ष्य केले. यावेळी सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, यावेळच्या निवडणुकीत एकीकडे चौकीदार आहे आणि दुसरीकडे डागदार नेत्यांची जमवाजमव आहे. पाच वर्षांपूर्वी मी तुमच्याकडे आशीर्वाद मागितला होता. तुम्हीही मला भरभरून प्रेम दिले. आता गेल्या पाच वर्षांत मी जे काम केले त्याचा सर्व हिशेब तुम्हाला देईन, तसेच इतरांचा हिशेबही घेईन. दोन्ही कामे एकाच वेळी सुरू राहतील तेव्हाच योग्य हिशोब होईल. शेवटी मी चौकीदार आहे आणि चौकीदार अन्याय करणार नाही.''काँग्रेसने गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देण्याचा केलेल्या घोषणेचाही मोदींनी समाचार घेतला. ''ज्यांना गेल्या 70 वर्षांत  सर्वसामान्य गरिबांचे साधे बँक खाते उघडता आले नाही. ते आता गरीबांच्या खात्यात पैसे काय जमा करणार, असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला.  ''गेल्या चार दशकांपासून आमचे जवान वन रँक वन पेन्शनची मागणी करत होते. त्यांचा मागणी पूर्ण करण्याचे काम या चौकीदाराने केले आहे. देशातील सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना 75 हजार कोटी रुपयांचे थेट आर्थिक सहाय्य देण्याचे कामही आमच्या सरकारने केले आहे.''असे मोदींनी सांगितले. 

 जमीन, आकाश आणि अंतराळ अशा तिन्ही ठिकाणी सर्जिकल स्ट्राइक करण्याचे काम याच चौकीदाराच्या सरकारने केले आहे. तसेच खुल्या प्रवर्गातील गरिबांना आरक्षण देण्याचा निर्णयही याच सरकारने घेतला आहे, असे मोदीं म्हणाले. काही वर्षांपूर्वी दिल्लीत भेसळ सरकार होते. तेव्हा देशाच्या विविध भागात बॉम्बस्फोट व्हायचे. त्यावेळी दहशतवाद्यांची जात, धर्म पाहिला जायचा, असाही टोला मोदींनी लगावला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा