शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता 6000 नाही तर 12 हजार मिळणार; मोदींची राजस्थानमध्ये घोषणा, कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 11:12 IST

Narendra Modi : एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवण्याची मोठी घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकर्‍यांच्या सक्षमीकरणासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत, त्यापैकी सर्वात प्रमुख योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये दिले जातात. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड दौऱ्यात या योजनेचा तिसरा हप्ता जारी केला होता. 

राजस्थानमध्ये याच दरम्यान, एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवण्याची मोठी घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी म्हणाले की, राजस्थानमध्ये भाजपाचे सरकार आल्यानंतर किसान योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 12,000 रुपये दिले जातील. याशिवाय एमपीसीवर शेतकऱ्यांकडून पीक खरेदी करून बोनस देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. म्हणजेच राजस्थानमध्ये भाजपाचे सरकार आल्यास राजस्थानच्या शेतकरी लाभार्थ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

मध्य प्रदेशातही भाजपाने आश्वासन दिलं आहे की, जर मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार स्थापन झाले तर पीएम किसान अंतर्गत 12,000 रुपये दिले जातील. यामध्ये सहा हजार रुपये केंद्र सरकार आणि सहा हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. 

ज्या शेतकऱ्यांची दोन हेक्टरपेक्षा कमी लागवडीयोग्य जमीन आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो. 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी 8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये योजनेचा 15 वा हप्ता जारी केला होता. याआधी, सरकारने 14 हप्त्यांमध्ये 2.62 लाख कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच पाठवली होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीBJPभाजपाRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक