शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नरेद्र मोदींनी शपथविधीसाठी रविवारचा दिवसच का निवडला? प्रभू श्रीरामांसोबत आहे खास कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 09:42 IST

Narendra Modi 3.0 : ...हा दिवस पंतप्रधान पदाची शपथ (Oath) घेण्यासाठी अत्यंत शूभ मानला जातो. 

नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. मात्र, अनेकांना प्रश्न पडला आहे की, या शपथविधी समारंभासाठी रविवार अर्थात ९ जूनचा दिवसच का निवडण्यात आला? तर, ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, तारीख बदलण्याचे कारण ९ जूनला निर्माण होणारा शुभ योगही असू शकते (यापूर्वी, सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ८ जूनला शपथविधी समारंभ होणार होता). ज्योतिषाचार्य डॉ. गौरव कुमार दीक्षित यांच्यानुसार, ९ जून, २०२४ ही ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी (विक्रम संवत् २०८१) आहे. हा दिवस पंतप्रधान पदाची शपथ (Oath) घेण्यासाठी अत्यंत शूभ मानला जातो. 

शासन अथवा सत्तेचा कारक - सूर्यज्योतिषाचार्यांच्या मते, ९ जून अर्थात रविवार  हा सूर्याचा दिवस आहे. आणि सूर्य देवच शासन अथवा सत्ता चालवतात. ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. याशिवाय, अंक शास्त्रानुसार ९ हा अंक मंगळ ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो आणि मंगळ हा ऊर्जेचा कारक मानला जातो. यामुळे, जेव्हा सूर्य आणि मंगळ या दोन्हींना एकत्रित साधून सरकार स्थापन केले जाईल, तेव्हा ते निश्चितत देश आणि जगात यश मिळवेल.

प्रभू रामचंद्रांचा जन्मही या नक्षत्रावर झाला होता - ज्योतिषाचार्य म्हणाले, रविवारी पुनर्वसू नक्षत्र आहे. प्रभु श्रीरामांचा जन्मही पुनर्वसू नक्षत्रावरच झाला होता. नरेंद्र मोदी हे प्रभू श्रीरामांचे अनन्य भक्त आहेत. महत्वाचे म्हणजे, पुनर्वसू नक्षत्रावर ज्या लोकांचा जन्म होतो, ते लोक इतरांची सेवा करण्यासाठी अथवा काही चांगले करण्यासाठी नेहमीच तयार असतात. यामुळे, निश्चितच पुनर्वसू नक्षत्रावर शपथविधी होत असल्याने, हे सरकार देशातील जनतेच्या भल्यासाठी आणि सेवेसाठी तत्पर राहील.

आज ६ शुभ योग -ज्योतिषाचार्य डॉ. तिवारी यांच्यानुसार, आज (रविवार ९ जून) ६ शुभ योगही तयार होत आहेत. यात पहिला म्हणजे, वृद्धि योग, दुसरा पुनर्वसू नक्षत्र, तिसरा रवि पुष्य योग, चौथा रवि योग, पाचवा सर्वार्थ सिद्धि योग आणि सहावा म्हणजे, तृतीया तिथी. पूर्वीच्या कार्यकाळाप्रमाणेच 'मोदी सरकार ३.०' साठीही मोदींनी शपथविधीसाठी वृश्चिक लग्नच निवडले आहे. ही एक स्थिर राशी बरोबरच त्यांच्या कुंडलीतील लग्न राशीही आहे. याच बरोबर या राशीला गुप्तपणे काम करणारी राशीही मानले जाते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४National Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी