शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Modi 3.0 : 'टीम मोदी'मध्ये कोण-कोण? मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी कुणा-कुणाला आला फोन? येथे पाहा 'लेटेस्ट लिस्ट'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 10:47 IST

Narendra Modi 3.0 : स्थापन होत असलेल्या या नव्या सरकारच्या अर्थात मोदी ३.० च्या कॅबिनेटमध्ये मंत्री पदाची शपथ घेण्यासाठी नेते मंडळींना फोनही यायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर अतापर्यंत अनेक नेत्यांना फोन आल्याचे समजते.

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये झालेल्या NDA च्या विजयानंतर आज नरेद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. स्थापन होत असलेल्या या नव्या सरकारच्या अर्थात मोदी ३.० च्या कॅबिनेटमध्ये मंत्री पदाची शपथ घेण्यासाठी नेते मंडळींना फोनही यायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर अतापर्यंत अनेक नेत्यांना फोन आल्याचे समजते.

या नेत्यांना आला फोन - सूत्रांच्या हवाल्याने झीन्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, फोन आलेल्या नेत्यांमध्ये राजनाथ सिंह (Rajnath Singh), शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan), नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह JDU नेते तथा राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर (Ram Nath Thakur), अपना दल (एस) च्या नेत्या अनुप्रिया पटेल (Anupriya Patel), लोजपा (राम विलास पासवान) अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan), हम प्रमुख जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi), रालोद प्रमुख जयंत चौधरी (Jayant Chaudhary), तसेच टीडीपी खासदार राम नायडू (Ram Naidu) आदींना फोन आले आहेत.

ज्योतिरादित्य सिंधियाही घेणार मंत्रीपदाची शपथ -मध्य प्रदेशात भाजपने जबरदस्त कामगिरी केली आहे. येथे भाजपने 29 पैकी 29 जागांवरही विजय मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवराज सिंह चौहान यांच्याशिवाय, ज्योतिरादित्य शिंदे यांनाही मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी पोन आला आहे. याशिवाय, JDS चे कुमारास्वामीही मंत्री होणार आहेत.

मोदी मंत्रिमंडळात ज्यांना ज्यांना संधी मिळणार त्यांना फोन जात आहेत. यामुळे ही यादी वाढण्याचीही शक्यता आहे. खरे तर, मोदी 3.0 मंत्रिमंडळाचे स्वरूप कसे असेल, यासंदर्भात केवळ अंदाज लावले जात आहेत. अद्याप अधिकृतपणे कसल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. 

टीडीपीला दोन मंत्रीपदं -यातच, टीडीपीने आपल्या कोट्यातील मंत्र्यांच्या नावाचा खुलासा केला आहे. टीडीपी नेते जयदेव गल्ला यांनी एक्सवर एका पोस्ट करत, आपल्या पक्षाला मोदी ३.० मंत्रिमंडळात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळाले असल्याचे म्हटले आहे. यांपैकी, तीन वेळचे खासदार राम मोहन नायडू हे कॅबिनेट तर पी. चंद्रशेखर पेम्मासनी हे राज्यमंत्री असतील.

 याशिवाय, भाजपमधील मोठ्या दलित चेहऱ्यांपैकी एक असलेले, मेघवाल यांनाही फोन आला आहे. अशा प्रकारे ते सलग तिसऱ्यांदा मोदी मंत्रिमंडळात सहभागी होऊ शकतात. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेRajnath Singhराजनाथ सिंहNitin Gadkariनितीन गडकरीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४